आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री (accident)रुपाली भोसले हिच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अभिनेत्री रुपाली भोसले पूर्णपणे सुखरूप आहे, मात्र तिच्या लक्झरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. रुपाली हिने काही महिन्यांपूर्वीच ही नवी कोरी मर्सिडिज बेंझ कार खरेदी केली होती आणि आता त्याच गाडीचा अपघात झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

रुपाली भोसले हिने स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ(accident) शेअर करत चाहत्यांना या अपघाताची माहिती दिली. व्हिडीओसोबत “Accident झाला, वाईट दिवस” असे कॅप्शन दिले असून, ब्रोकन हार्टचं इमोजी देखील शेअर केले आहे.
अपघातानंतर गाडीच्या बोनेटला मोठा डेन्ट आला असून समोरच्या बाजूनेही ते डॅमेज झाले आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे प्रकाशझोतात (accident)आलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लंपडाव’ या मालिकेत ‘सरकार’ या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्यांच्यासोबत चेतन वडनेरे आणि कृतिका देव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 

 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;

भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!