आपल्यापैकी अनेकांनी विमानाने प्रवास करताना विमानतळावर सीआरपीएफ(photos)जवानांची फौज तैनात असल्याचं पाहिलं असेल. केंद्रीय राखीव दल म्हणजेच सीआरपीएफचे जवान हे अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर तैनात केले जातात जिथे अत्यंत कठोर सुरक्षेची गरज असेल. मात्र लोकांच्या संरक्षणासाठी तैनात केलेल्या याच जवानांपैकी एखादा येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचे चोरुन फोटो काढत असेल तर? असाच काहीसा दावा एका अभिनेत्रीने केला असून यासंदर्भातील एका व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडली आहे.

सोशल मीडियावरील इन्फ्युएन्सर आणि अभिनेत्री आयेशा खानने (photos)अलीकडेच नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सोशल मीडियावरुन जगजाहीर केला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सीआरपीएफ जवानाने लपूनछपून तिचे फोटो काढल्याचा आरोप आयेशा खानने केला आहे. तिने पुरावा म्हणून एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडिओला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून आरोप करणाऱ्या आयेशाने सीआरपीएफ जवान तिचे फोटो काढताना फोन कॉलवर असल्याचे भासवत होता असंही म्हटलं आहे.

व्हायरल रीलमध्ये आयशा खानने या जवानाला रंगेहाथ (photos)पकडल्याचं दिसत आहे. आयशा खान या व्यक्तीला तिचे लपूनछपून काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगत आहे. “हटा दिया, वो ऑटोमॅटिक क्लिक हुआ था,” मी फोटो काढून टाकले आहेत; ते एक चुकून क्लिक झालेले असे त्या माणसाने आयशाने आक्षेप घेतल्यावर फोटो डिलीट करताना सांगितले. व्हिडीओमध्ये या व्यक्तीच्या गळ्यात सीआरपीएफचं ओळखपत्र दिसत आहे. घटनेची माहिती शेअर करताना आयशा खानने, “16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर टर्मिनल 1 मला खूप त्रासदायक अनुभव आला. एक माणूस फोन कॉलवर असल्याचे भासवत लपूनछपून माझे फोटो काढत होता. मी त्याला या बाबत जाब विचारला तेव्हा तो आधी नकार देत राहिला.

मी त्याला त्याचा फोन पाहून असं म्हणून फोन पाहण्यास भाग पाडेपर्यंत तो नाहीच म्हणत होते. (photos)मात्र त्याच्याकडे माझे फोटो होते. त्याने माझ्या पायांचे फोटो काढले होते,” असं म्हटलं आहे.”सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे तो एक सीआरपीएफ कर्मचारी होता. त्यांच्यावरच आपली सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी असते. जर एखादी महिला विमानतळावर अगदी कॅमेरांच्या देखरेखीखाली, अधिकाऱ्यांनी वेढलेली असताना आणि सशस्त्र सुरक्षा असतानाही सुरक्षित नसेल, तर तिला कुठे सुरक्षित वाटेल?” असा”भारतात महिलांची सुरक्षा ही एक क्रूर विनोद झाला आहे. त्यातही जेव्हा आपले संरक्षण करण्याचे काम करणारे त्या विश्वासाचे उल्लंघन करतात, तेव्हा हे केवळ गैरवर्तन नसतं तर त्याचा याहूनही अधिक मोठा अर्थ असतो. हा सरळ सरळ विश्वासघात आहे,” असं भारतातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयशा खानने पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 

 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;

भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!