व्हिएतनाम आता आणखी एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.(disaster)व्हिएतनामला सर्वात मोठं आणि धोकादायक वादळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 113 किमी एवढा प्रचंड आहे. बुआलोई नावाचं हे चक्रीवादळ सध्या वेगानं व्हिएतनामकडे सरकत आहे. हे वादळ व्हिएतनामला धडकणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर 15 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. व्हिएतनाम सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. व्हिएतनामच्या हवामान विभागाकडून देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे तेच चक्रीवादळ आहे, ज्या चक्रीवादळाने फिलिपिन्समध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. या चक्रीवादळामुळे फिलिपिन्समध्ये दहा लोकांचा मृत्यू झाला होता तर देशाच्या अनेक भागांमध्ये महापूर आला होता. आता हे चक्रीवादळ प्रचंड वेगानं व्हिएतनामकडे सरकलं असून, याचा वेग दुप्पट बनला आहे. (disaster)113 किमी प्रति तास वेगानं हे वादळ व्हिएतनामला एक ऑक्टोबर रोजी धडकण्याची शक्यता आहे. या काळात देशात 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. प्रचंड पावसामुळे नद्यांना महापूर येणार आहे.
बुआलोई चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, आतापर्यंत ज्या भागांमध्ये सर्वाधिक धोका आहे, अशा भागातील 15,000 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. ज्या भागात हे चक्रीवादळ धडकणार आहे, त्या भागांमध्ये खबरदारी म्हणून हजारो सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हे चक्रीवादळ येत्या एक ऑक्टोबरला व्हिएतनामला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या घराचं जास्त नुकसान होऊ नये यासाठी तेथील लोक आपल्या घराच्या छतांची दुरूस्ती करत आहेत.

दोन दिवसांनंतर या चक्रीवादळाचा मोठा तडाखा व्हिएतनामला बसणार आहे,(disaster) त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आदेश तेथील सरकारने दिले आहेत.या चक्रीवादळामुळे व्हिएतनामचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, हे चक्रीवादळ तब्बल ताशी 113 किमी प्रति तास वेगानं व्हिएतनामला धडकण्याची शक्यता आहे. देशावर अतिमुसळधार पाऊस, वादळ आणि महापूर असे तिहेरी संकट एकाचवेळ निर्माण झालं आहे.
हेही वाचा :
तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;
भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!