सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि अनेकांचच कल खरेदीकडे दिसत आहे.(favorite)त्यातच सरकारनं जीएसटी प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल केल्यानं या दिवसांमध्ये एखादी कमाल गोष्ट घरी आणण्यासाठी बरीच मंडळी उत्सुक आहेत. काहींनी यंदाच्या खरेदीसाठी तंत्रज्ञानावर आधारित गोष्टींना पसंती दिली आहे. अशाच टेकप्रेमींसाठी एक नवी गोष्ट भारतात नुकतीच लाँच झाली असून, चित्रपट किंवा टिव्ही प्रेमींसाठी ही एक परवणीच आहे. कारण चक्क खिशात भरून हवं तिथं थिएटर घेऊन जाणं शक्य झालं आहे.

Portronics कंपनीनं नुकतंच भारतात एक पोर्टेबल प्रोजेक्टर लाँच केला आहे. Pico 14 असं या प्रोजेक्टरचं नाव. आकारानं अतिशय लहान अशा या प्रोजेक्टरचे फिचर कोणा एका मोठ्या प्रोजेक्टरप्रमाणंच आहेत, ज्या माध्यमातून कुठंही कधीही मोठ्या पडद्यावर सीरिज, चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येऊ शकतो.(favorite) वजनानं हलका तरीही परफॉर्मन्सच्या बाबतीत कुठंही कमी न पडणारं हे उपकर टिव्हीप्रेमींसाठी अतिशय खास.

Portronics Pico 14 हा एक mini rechargeable DLP प्रोजेक्टर आहे. याचा आकार 73x73x60mm असून वजन 250 ग्रॅम आहे. त्याचा लहानसा चौकोनी आकार डिझाईन ट्रायपॉड सपोर्टसह मिळतो आणि या प्रोजेक्टरच्या माध्यमातून 100 इंचांची मोठी स्क्रीन साधारण 720p मध्ये पाहता येते. ज्यामध्ये 1600 ल्यूमन्स ब्राईटनेस मिळतो.हो! Pico 14 मध्ये 4,800mAh बॅटरी देण्यात आली असून, विजेच्या वापराशिवाय ते तासभर चालू शकतं. त्यामुळं कॅम्पिंग, प्रवास अशा अनेक प्रसंगी तुम्ही त्याचा वापर करू शरता. कंपनीच्या दाव्यानुसार या उपकरणात 30,000 तासांची लॅम्प लाईफ आहे. ज्याचा वापर दीर्घकाळासाठी दिसून येतो.

फिचर एका नजरेत….
4K इनपुट सपोर्ट
Android 13 OS
ऑटो फोकस, रिमोट कंट्रोल, कीस्टोन करेक्शन
Dual-Band WiFi, Bluetooth 5.4
3W इनबिल्ट स्पीकर
25db पर्यंत नॉइज़ ऑपरेशन

खिशात मावणाख्या लहानशा टिव्हीवजा थिएटरची भारतातील किंमत आहे 28,349 रुपये. हे उपकरण अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर रिटेलर साईटवरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (favorite)ज्यासोबत ग्राहकांना 12 महिन्यांची वॉरंटी मिळते.

हेही वाचा :

SUV खरेदी करायचीये का? 

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;