शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे खासदार संजय राऊत (sleeping)यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जिव्हारी लागणारे वार केले.राऊत म्हणाले – “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा असे मुहूर्त पाहून केली नव्हती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची घोषणा करतील, तोच खरी साडेचारचा मुहूर्त असेल.”“दसऱ्याला फक्त दोनच मेळावे महत्वाचे आहेत – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. बाकी इतर मेळाव्यांना तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे.”

यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “ चोर बाजारात माल विकायचा असतो, दिल्लीतही चोर बाजार आहे.(sleeping)नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे. तिथे त्यांनी राजकारणातला चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग आणि भाजप सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. आतून मानावं लागतं.”“प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातील. अरे, तुम्ही कोण? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होता? कुठल्या गोधडीत मुतत होता? जर वाटत असेल की तुम्हीच शिवसेना स्थापन केली, तर जन्माचे दाखले घेऊन या.”

पुढे ते म्हणाले , “एकनाथ शिंदे रोज सकाळी स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात. पण बाळासाहेब कधीच दिल्लीच्या चरणी झुकले नाहीत. निर्णय घ्यायला कधीच मोदी-शहांच्या दारात उभे राहिले नाहीत. (sleeping)शिंदेंचा पक्ष म्हणजे नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. मी त्याला पक्ष मानत नाही. पावसाळ्यात जशी गांडुळे निर्माण होतात, तशीच त्यांची अवस्था आहे. मोदी-शहा आहेत तोवर ते राहतील, नंतर पावसाळ्यातील गांडुळांसारखे संपतील.”

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांचा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. आझाद मैदानावर त्यांचा दसरा मेळावा पार पडत असे.(sleeping) पण यावर्षी दसऱ्याच्या दिवशी पाऊस सांगितल्याने शिंदे यांनी त्यांचे ठिकाण बदलण्याचे ठरवले आहे.उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवाजी पार्क शिवतीर्थ वरच दसरा मेळावा घेण्याचे ठरवले आहे. राऊतांच्या या तीव्र हल्ल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला