गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या(flood) मदतीवरून उद्धव ठाकरे महायुती सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. यावर आता भाजपने प्रतिहल्ला करत ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईतील अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याऐवजी तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य केले आहे. “मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत.

उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची. मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल”, असे ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.(flood)“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा… त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की”, असेही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदेनीही आझाद मैदानावर दसरा मेळावा सुरु केला आहे. पण या वर्षी दसऱ्याच्या दिवशी पाऊस सांगितल्याने शिंदे गट दसऱ्यासाठी इतर जागेंची चाचपणी करत आहे. तर ठाकरे गट मात्र आपला मेळावा शिवतीर्थावरच घेणार यावर ठाम आहे.(flood) मुसळधार पावसाचा अंदाज असूनही, शिवसेनेच्या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतीर्थावरील चिखलाचा प्रश्न असला तरी मेळावा रद्द होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.यासाठी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असून, मेळाव्याच्या नियोजनाला वेग देण्यात आला आहे. आजपासूनच शिवाजी पार्कवर तयारी सुरू होणार आहे. त्यामुळे एकीकडे भाजपची मागणी आणि दुसरीकडे ठाकरे गटाची जिद्द यामुळे यंदाचा दसरा मेळावा अधिकच गाजणार आहे.
हेही वाचा :
तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;
भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!