ऐनदिवाळीच्या काळात सोलापुरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.(religious)सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आली आहेत.आज धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे, यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती.सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी भोंगे उतरवण्याबाबत निर्णय घेतलाय. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली होती.

सोलापूर शहरात मंदिरे, मशिदी, मदरसा, चर्च, बुद्धविहार अशी ८९३ धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत. त्यापैकी आज २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. (religious)यात १९२ मस्जिद आणि दर्गा, ७९ मंदिरे, १० चर्च आणि ८ बौद्ध विहार असे एकूण २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाहेरील तथा वरच्या बाजूला भोंगे लावता येणार नाहीत.
तसेच भोंगे लावण्यासाठी यापुढे परवाना दिला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये भोंग्यांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरूय. भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्यानं सरकारनं अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या आणि जास्त आवाज करणाऱ्या भोंग्यावर सरकारनं जुलै महिन्यात मोठी कारवाई केली होती.आता सोलापुरात पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकारानंतर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.

मागील महिन्यात एका पक्षाच्या नेत्यानं भोंग्यांच्याविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं.(religious) मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंची चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं.पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या ९९ टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवलेत. मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्येही व्हावी, अशी अपेक्षा आहे. तर ९०० वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील खाली उतरवण्यात आलाय.
हेही वाचा :
किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य