क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. (World)वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि १९७५ वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिनिदादमधील वॉल्सॉल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वेस्ट इंडियन क्रिकेटमधील ते महान खेळाडू होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.१९७५ च्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजकडून खेळाताना उत्कृष्ट कामगिरी केली होती.

त्यांनी ग्रुप स्टेजच्या सामन्यात श्रीलंकेच्या विरुद्ध चार गडी बाद केले होते. (World)उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धही चार विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यांनी फलंदाजीद्वारे योगदान दिले होते. ते वेस्ट इंडियन संघासाठी महत्त्वाचे खेळाडू होते.बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजसाठी एकूण २४ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७६६ धावा केल्या. सोबतच त्यांनी ५० बळी देखील घेतले. त्यांनी १२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही सहभाग घेतला होता.

त्यात ज्युलियन यांनी ८६ धावा केल्या होत्या आणि १८ विकेट्स घेतल्या होत्या.(World) त्यांची समृद्ध अशी कारकीर्द होती. अनेक वेस्ट इंडियन खेळाडूंना त्यांनी प्रेरणा दिली होती.बर्नार्ड ज्युलियन यांच्या निधनावर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष किशोर शैलो यांनीही ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्युलियन यांच्या निधनाच्या बातमीवर त्यांनी दु:ख व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्डाकडून बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा :
किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य