ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

अनेकांना ऑफिस ब्रेकमध्ये चहा पिण्यासोबत सिगारेट ओढण्याची सवय असते, परंतु याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

ऑफिस ब्रेकमध्ये तुम्ही अनेकांना चहासोबत सिगारेट ओढताना पाहिल असेल. आजकाल याला ‘चाय-सुट्टा’ ब्रेक असेही म्हटले जाते. ऑफिसबाहेरच्या स्टॉलवर बहुतेक लोक एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन बसलेले दिसतात. (office breaks) यामुळे तात्पुरता तणाव कमी होण्यास मदत होत असली तरी, याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. चहा आणि सिगारेट एकत्र पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. चहाबरोबर सिगारेट ओढल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या.

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्यावर छान का वाटते
डॉक्टरांच्या मते, चहामध्ये कॅफीन असते, जे अलर्टनेस वाढवते आणि सिगारेटमधील निकोटीन हे आणखी तीव्र करते. यामुळे काही काळासाठी ताण कमी झाल्यासारखे वाटू शकते, (office breaks) परंतु यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढतो. दररोजच्या या सवयीमुळे हृदय कमकुवत होऊ शकतो. तसेच, कर्करोगसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात
फुफ्फुसांवर परिणाम- सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसांमध्ये विषारी घटक जमा होतात, (office breaks) ज्यामुळे श्वसनविकार, खोकला आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
हृदयरोगाचा धोका – चहाबरोबर वारंवार सिगारेट ओढल्याने हाय बीपीचा त्रास होऊ शकतो, तसेच हृदयरोग होण्याचा धोका देखील वाढतो.
पोटाशी संबधित समस्या- रिकाम्या पोटी चहा आणि सिगारेटचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.
मानसिक आणि शारिरीक तणाव- या सवयीमुळे सुरुवातीला रिफ्रेश वाटू शकतं, परंतु कालांतराने शारिरीक आणि मानसिक तणाव वाढतो.
सवयी सोडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
चहा आणि सिगारेटचे व्यसन एकदम सोडू शकत नाही, म्हणून ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुम्हाला चहा आणि सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होत असेल तेव्हा स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी, लिंबू पाणी, हर्बल टी यांसारख्या आरोग्यदायी पेयांचे सेवन करू शकता.
सिगारेटच्या व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप, टॉफी किंवा ड्राय फ्रुट्स खा.
नियमित व्यायाम केल्याने निकोटीनची क्रेव्हिंग कमी होते आणि मूड सुधारतो. म्हणून दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा.

हेही वाचा

चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू

महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात

बोरगावात कडकडीत बंद