महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या नृत्याविष्काराच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय झालेली नृत्यांगणा(Dancer) गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये एका रिक्षाला कारने दिलेल्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचलक गंभीर जखमी झाला आहे. ज्या कारने ही रिक्षा उडवली ती कार गौतमी पाटीलच्या मालकीची असल्याचं समोर आल्यापासून या अपघाताची जोरदार चर्चा आहे. गौतमीच ही गाडी चालवत होती, ऐनवेळी चालक बदलला अशा आरोपापासून ते गौतमीला अटक करण्यापर्यंतची चर्चा या विषयावर झाली. मात्र या विषयावर आतापर्यंत कोणतंही भाष्य न केलेली आणि प्रसारमाध्यमांसमोर न आलेली गौतमी अखेर मंगळवारी रात्री पहिल्यांदाच या विषयावर बोलली.

आपली भूमिका मांडताना गौतमीने पोलीस चौकशीत काय झालं? ती आधीच बोलायला समोर का आली नाही? सोशल मीडियावर सुरु असलेलं ट्रोलींग यासारख्या अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. गौतमीने अपघाताबद्दल बोलातना सीसीटीव्ही फुटेजबद्दल भाष्य केलं आहे. गौतमी(Dancer) नेमकं काय म्हणालीये पाहूयात.”मी त्यामध्ये दोष नाही. मी पोलिसांना देखील हे सांगितलं आहे. कार माझी होती पण मी कारमध्ये नव्हते,” असं गौतमी पाटीलने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना गौतमीने तिच्यावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही भाष्य केलं. “सगळे मला सर्व लोक ट्रोल करत आहेत. कोण काय म्हणते आता मी लक्ष देत नाही.

तुम्ही आणखीन ट्रोल करा,” असंही गौतमीने म्हटलं आहे.”पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आहेत. मी त्या गाडीत नव्हते. तरीही मला दोषी ठरवलं जात आहे. मी याकडे लक्ष देणार नाही,” असंही गौतमी म्हणाली. या प्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये अपघाताच्या काही वेळ आधी दोन व्यक्ती अपघातग्रस्त कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोघे कोण होते इतकी स्पष्टता सीसीटीव्ही फुटेजमधून मिळत नाहीये.

या अपघातानंतर सोशल मीडियावरुन गौतमीला दोषी ठरवत ट्रोल केलं जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रश्न विचारला असता गौतमीने यावरही स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देताना, “नको त्या गोष्टींचा आरोप माझ्यावर का लावले जात आहेत, याचं कारण मला माहित नाही,” असं सांगितलं. “मी ज्या गोष्टीत नाही त्यात मला पाडू नका असं माझं म्हणणं आहे,” असंही गौतमीने स्पष्ट केलं.पोलिसांनी काय चौकशी केली? असं विचारण्यात आलं असता गौतमीने, “माझं पोलिसांना पूर्ण सहकार्य आहे,” असं पहिल्याच वाक्यात स्पष्ट केलं. तसेच, “जे दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी माझा याला सपोर्ट आहे.

या गोष्टीवर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरवू नका,” असं आवाहन गौतमीने केलं आहे. तुम्ही पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं अशी मागणी सोशल मीडियावरुन होत असल्याचा संदर्भ देत गौतमीला प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर गौतमीने, “मी त्यावेळी माझ्या भावाना पाठवलं, मला असे रिप्लाय आले की त्यामुळे मी असा विचार केला की मी जाऊनही तिथे काही उपयोग होणार नाही,” असं उत्तर दिलं.

हेही वाचा :

भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…