कर्मचारी(employees) भविष्य निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी मोठा बदल आणत आहे. जानेवारी २०२६ पासून सदस्यांना त्यांच्या पीएफ खातेातून थेट एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFOच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बोर्ड बैठकीत या सुविधेला मंजुरी देण्याचा निर्णय घेऊ शकतो.

एटीएमद्वारे पैसे काढण्यामुळे सदस्यांना ऑनलाईन क्लेम जमा करण्याची गरज उरणार नाही आणि त्यांना लांब प्रतीक्षेत बसावे लागणार नाही. कर्मचारी सहजपणे कोणत्याही एटीएम ब्रँचमध्ये जाऊन त्यांच्या पीएफचे पैसे काढू शकतील.श्रम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्रालयाने बँकांसह आरबीआयसोबत EPFO एटीएम सुविधा सुरु करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. ही सुविधा लोकांना त्यांच्या पीएफ खात्यापर्यंत जलद आणि सोप्या पद्धतीने पोहोचण्यास मदत करेल.

सध्या EPFOकडे ७.८ कोटी नोंदणीकृत सदस्य आहेत, ज्यांच्याकडे एकूण २८ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमा आहे. या सुविधेअंतर्गत, EPFO सदस्यांसाठी एक विशेष कार्ड जारी करेल, ज्याद्वारे ते त्यांच्या पीएफमधून काही भाग थेट एटीएममधून काढू शकतील.

यावर्षी EPFOने ग्राहकांसाठी निधी काढण्याची रक्कम १ लाख रुपयांहून वाढवून ५ लाख रुपये केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल व प्रणाली-चालित आहे आणि सदस्यांच्या KYC तपशीलांवर आधारित आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा आपातकालीन परिस्थितीत विशेष उपयुक्त ठरेल आणि सदस्यांना त्यांच्या पैशांचा त्वरित वापर करता येईल(employees).

हेही वाचा :

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत
दूषित पाण्याचा कहर….
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता