बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप ही एक दशकांपूर्वीची चर्चित घटना होती, जी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत या नात्याबाबत (relationship)मोठा खुलासा केला आहे. इस्माईल दरबार यांनी सांगितले की, सलमान आणि ऐश्वर्या खूप जवळचे होते आणि त्यांचा ब्रेकअप दोघांनाही मोठा धक्का देणारा ठरला. त्यावेळी संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यातही खटके उडत होते.

भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्या दोघांनीही काम केले होते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मात्र, ‘देवदास’ चित्रपटात सलमानला घेण्यात आलं नाही, आणि शाहरुख खानला कास्ट केलं गेलं. या निर्णयामुळे सलमानला मोठा धक्का बसला.
इस्माईल दरबार म्हणाले, “ब्रेकअपमुळे आम्हालाही मोठा धक्का बसला. ते दोघे खूप जवळचे होते. मला वाटते की त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे. पण आता हा सर्वकाही भूतकाळात गेला आहे. सलमान देखील समजदार आहे आणि या विषयावर कधीही बोलत नाही.”सलमान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने काही वर्षांत अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगी, आराध्या बच्चन आहे.हा ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला ब्रेकअप ठरला असून, चाहत्यांसाठी अजूनही एक रोमांचक आठवण आहे(relationship).
हेही वाचा :
टीम इंडियासाठी गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू दुखापतीनंतर परतण्यासाठी सज्ज..
‘Kantara Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले