बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री(actress) रेखा आजही तिच्या सौंदर्य, शैली आणि फिल्मी कारकिर्दीसाठी चर्चेत आहे. मात्र रेखा फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर तिच्या लव्ह लाइफ आणि अफेयर्समुळेही कायम चर्चेत राहिली आहे. अनेक मुलाखती सांगतात की, रेखा नेहमीच अमिताभ बच्चनच्या प्रति आकर्षित होती आणि एका काळात त्यांचं नातं खूप चर्चेत आलं होतं.

रेखा आणि अमिताभने ‘सिलसिला’, ‘दो अंजाने’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांच्या ऑनस्क्रीन कमेस्ट्रीमुळे ऑफ-स्क्रीन अफेयर्सच्या चर्चा सुरू झाल्या. ज्या आजही सुरु आहेत.विनोद मेहरा – रिपोर्ट्सनुसार रेखा आणि विनोद मेहरा यांच्यात चांगले नाते होते. रेखा त्यांना प्रेमाने ‘Vin Vin’ म्हणत बोलायची. मात्र विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला बहू म्हणून स्वीकारले नाही. त्यामुळे या नात्याला सार्वजनिक रूप मिळू शकले नाही.
जीतेंद्र – कामाच्या ठिकाणी रेखा आणि जीतेंद्र यांच्यात आकर्षण होतं पण ते स्थायी न राहता नातं संपलं कारण जीतेंद्र आधीच विवाहित होते.
किरण कुमार – रेखा काही काळ किरण कुमारच्या संपर्कात होती. परंतु, त्यांच्या काही सवयी जसे वेळेवर परत न जाण. ‘मॉम-बॉय’ वागणूक यामुळे त्यांचं नातं तुटलं.
मुकेश अग्रवाल – रेखाचे सर्वात विवादित नातं. दोघांनी 1990 मध्ये विवाह केला पण फक्त 7 महिन्यांतच ते विभक्त झाले. मुकेश अग्रवालने नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्याबाबत माध्यमांमध्ये रेखा वर आरोप झाले होते.
संजय दत्त – ‘जमीन आसमान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. अफवा फक्त चर्चेसाठी राहिल्या. रेखाने त्यास अधिकृत मान्यता दिली नाही.
अक्षय कुमार – ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अफवा पसरली, की रेखा आणि अक्षय यांच्यात जवळीक वाढली होती. परंतु, अक्षय आणि रेखा या अफवांचा नेहमीच खंडन करत राहिले.

रेखाने जवळपास 180 चित्रपट केले. ज्यापैकी 40-50 चित्रपट ‘हिट’ किंवा ‘सुपरहिट’ ठरले. त्यात ‘उमराव जान’, ‘सिलसिला’, ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. रेखा फक्त अभिनयासाठीच नव्हे तर फॅशनसाठीही ओळखली जाते. 70-80 च्या दशकात तिचा स्टाइल आणि बोल्ड लुक खूप प्रसिद्ध होता.आजही तिचा कांजीवरम साडी लुक, गोल्ड ज्वेलरी, रेड लिपस्टिक हे क्लासिक मानलं जातं. अनेक सेलिब्रिटी आणि फॅशन शोमध्ये रेखाच्या लुकची तुलना केली जाते(actress).
हेही वाचा :
मतदारांची नावे आता पाहता येणार वेबसाईटवर; निवडणूक आयोगाने केली तयारी
दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला मिळतील 6 आश्चर्यकारक फायदे; होतील हे आजार दूर
RBI चा धक्कादायक निर्णय, बड्या बँकेचा थेट परवानाच रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ!