बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध(superstar) अभिनेत्री तब्बू तिच्या दीर्घ आणि यशस्वी करिअरमुळे सदैव चर्चेत राहिली आहे. 30 ते 40 वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू जवळपास 27 वर्षांनंतर तिच्या पूर्वसहकारी आणि एक्स-लव्हर नागार्जुन अक्किनेनी सोबत चित्रपटात परत काम करण्यास सज्ज आहे. हा नागार्जुनांचा 100 वा चित्रपट असेल, ज्याचे सध्याचे नाव चर्चेत ‘किंग 100’ किंवा ‘लॉटरी किंग’ असं आहे.
या चित्रपटात तब्बूची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि कथेला पुढे नेण्याचं काम करेल. चित्रपट तमिळ दिग्दर्शक आर.ए. कार्तिक दिग्दर्शित करणार आहेत, आणि हा एक कौटुंबिक अॅक्शन ड्रामा असण्याची शक्यता आहे. तब्बू आणि नागार्जुन यांनी शेवटी 1998 मध्ये ‘आविडा मा आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यानंतर ही जोडी जवळपास तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे.

सध्या ही माहिती अधिकृत जाहीर नाही, तरी सोशल मीडियावर(superstar) चाहत्यांमध्ये उत्साह आहे. जर ही बातमी खरी ठरली, तर ही फिल्म तब्बू आणि नागार्जुनच्या चाहत्यांसाठी एक विशेष भेट ठरेल, आणि दोघांचे फॅन्स त्यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा :
नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार