उत्तर प्रदेश : प्रयागराज येथील सोरावमध्ये एक अजब घटना घडली, ज्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. एका माकडाने एका वकिलाच्या ५० हजार रुपयांच्या बॅगेवर ताबा मिळवला आणि नोटांचा वर्षाव सुरू केला.माहितीनुसार, वकिलाने आझाद सभागृहासमोर बाईक उभी केली होती आणि डिकीत महत्त्वाची कागदपत्रे तसेच नोटांचे बंडल ठेवले होते. अचानक एक माकड तिथे आले आणि हुशारीने डिकीतून बॅग काढली. त्यानंतर माकड (Monkey)जवळच्या पिंपळाच्या झाडावर चढले आणि बॅग फाडून ५०० रुपयांच्या नोटा हवेत उडवू लागले.

हवेत उडणाऱ्या नोटांचे दृश्य पाहून उपस्थित लोक हैराण झाले. काही जण हसत होते, तर काहीजण नोटा उचलण्यासाठी धावले. परिसरात एकच गोंधळ उडाला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, माकड (Monkey)झाडाच्या फांदीवर बसून नोटा खाली टाकत आहे, तर खाली असलेले लोक ओरडत आहेत आणि नोटा उचलत आहेत. काही क्षणांतच माकड पळून गेले, आणि वकिलाला बॅगेतील पैशांचा अपघात समजला.
हा विचित्र प्रसंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांनी माकडाच्या या हास्यजनक, पण धक्कादायक कारनाम्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे सुरू केले आहे.
हेही वाचा :
जर तुम्ही बोट घातलं तर….’, अमित ठाकरेंनी दिला जाहीर इशारा…
कुत्र्याची शिकार करायला घरात घुसला अन् उंदराला पाहताच पळत सुटला; भित्र्या वाघोबाचा मजेदार Video Viral
बाल संरक्षण गृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…