‘महादेवी’ हत्तीणीला (elephant)नांदणी मठातून वनतारा येथे हलवण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी हाय पॉवर कमिटीसमोर अद्याप होऊ शकलेली नाही, कारण प्राणी कल्याण संस्था पेटा ने वनतारा आणि नांदणी मठाने सादर केलेल्या एकत्रित उत्तरावर आक्षेप घेतला आहे.

महादेवीला वनतारा पाठवण्याच्या संदर्भात वनतारा आणि नांदणी मठाच्या व्यवस्थापनाने एकत्रितपणे उत्तर हाय पॉवर कमिटीसमोर सादर केले होते. दोन्ही पक्ष एकाच भूमिकेवर असल्यामुळे महादेवीला वनतारा हलवण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा होती. मात्र पेटा संस्थेच्या आक्षेपामुळे नियोजित सुनावणी होऊ शकली नाही.
पेटाने या आक्षेपामागे मुख्य कारण महादेवी हत्तीणीच्या(elephant) आरोग्याच्या स्थितीबाबत अधिक स्पष्टीकरणाची गरज असल्याचे म्हटले आहे. हत्तीणीला असलेल्या आजारांविषयी आणि तिच्या स्वास्थ्याविषयी विस्तृत माहिती हाय पॉवर कमिटीसमोर सादर करणे आवश्यक असल्याचा मुद्दा पेटाने उपस्थित केला आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हाय पॉवर कमिटीच्या अहवालानंतर हे प्रकरण पुन्हा कमिटीकडे वर्ग केले होते. सुनावणी न झाल्यामुळे आता लवकरच हाय पॉवर कमिटी नवी सुनावणी तारीख जाहीर करेल, आणि त्या तारखेला कमिटी पेटाच्या आक्षेपांवर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
तो पर्यंत निवडणुकाच घेऊ नका, राज ठाकरेंची मोठी मागणी…
Samsung Galaxy M17 5G च्या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स…
‘तिचे एकाच वेळी दोघांसोबत संबंध…’; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा