भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या दिवसांत तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे संघ आता ऑस्ट्रेलियाला पोहोचला असून सरावाला(Team India) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील सर्व लक्ष Virat Kohli आणि Rohit Sharma यांच्याकडे असणार आहे, मात्र मालिकेपूर्वी काही महत्त्वाच्या अपडेटने क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगवली आहे.

वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे होता, परंतु ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी शुभमन गिलला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाचा उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यर निवडला गेला आहे. त्यामुळे दोन माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आता युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहेत. चर्चा अशी आहे की ही रोहित आणि विराटची शेवटची मालिका असू शकते, आणि जर मालिकेत चांगली कामगिरी झाली नाही तर २०२७ च्या विश्वचषकात प्रवेश न मिळाल्यास निवृत्ती घ्यावी लागू शकते.

दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून जोरदार सराव करत आहेत. त्यांच्या सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाला पोहोचताच एका गोष्टीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे, ज्यामुळे (Team India)दोघांमध्ये काहीतरी तणाव किंवा गैरसमज असण्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गिल आणि रोहित एकमेकांना गळाभेट देताना आणि विचारपूस करताना दिसत होते.

रोहितने मालिकेपूर्वी शिवाजी पार्क मैदानावर बरीच मेहनत घेतली आहे आणि गेल्या दोन महिन्यांत सुमारे दहा किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे. आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रोहितच्या कामगिरीसह शुभमन गिलच्या नेतृत्वावर असेल, आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत दोघांची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचे तिकीट आहे.

हेही वाचा :

दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य..
‘राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका…’
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; ‘या’ बँकेवरचे सर्व निर्बंध हटवले…