इचलकरंजीत गोदरेज कंपनीच्या अत्याधुनिक आणि आकर्षक ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन(inauguration) सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गजराज बॅटरी शेजारी स्थापन करण्यात आलेल्या या शोरूमचे उद्घाटन परमपूज्य श्री. ईश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते झाले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मा. श्री. राहुल आवाडे, माजी आमदार मा. श्री. सुरेश हाळवणकर, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त मा. सौ. पल्लवी पाटील, पुणे महानगरपालिका उप आयुक्त मा. श्री. अरविंद माळी, कोल्हापूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रविंद्र माने, माजी नगरसेवक मा. श्री. मदन कारंडे, रीजनल गोदरेज ब्रांच हेड पुणे मा. श्री. भरणी कुमार पटनायक, गोदरेज इबीओ हेड मा. श्री. राजेश ए. आर. आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. उद्घाटन प्रसंगी गोदरेज कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स – फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, ओव्हन, डीप फ्रीज आणि इतर होम अप्लायन्सेस – यांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले. सर्व वस्तूंवर विशेष सवलती आणि स्कीम्स जाहीर केल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स यांनी केले होते. संस्थेचे प्रमुखांनी सांगितले की, इचलकरंजीसारख्या प्रगतीशील शहरात गोदरेजसारखा विश्वासार्ह ब्रँड आता ग्राहकांच्या दारी उपलब्ध झाला आहे.
या भव्य उद्घाटनाने(inauguration) शहरात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गोदरेज ब्रँड शॉप हे शहरातील ग्राहकांसाठी आधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह वस्तूंचे एकमेव ठिकाण ठरणार आहे.
हेही वाचा :
भारतात Triumph Speed Triple 1200 RX लाँच, किंमत…
‘वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिलेले…’; गर्भपाताबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न