राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले होते. मात्र, आता खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उघड केले की, चोरट्यांनी त्यांच्या घरातून काही अत्यंत महत्त्वाच्या सीडी, पेनड्राईव्ह(pen drive) आणि कागदपत्रांचाही चोरी केला आहे.

या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय होतं, याबाबत त्यांनी खुलासा केला नसला तरी त्यांनी सांगितले की, ही कागदपत्रं त्यांनी माहिती अधिकारातून मागविलेली होती आणि त्यांचा संबंध काही भ्रष्टाचार प्रकरणांशी होता. त्यामुळे ही चोरी केवळ घरफोडी नसून काही विशिष्ट उद्देशाने करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

खडसे यांनी सांगितले की, “ही फक्त साधी चोरी नाही, कारण चोरट्यांना माझ्या घरात काय ठेवले आहे हे माहित असल्याशिवाय त्यांनी इतकी अचूक चोरी केली नसती. चोरीपूर्वी परिसरातील लाईट बंद होते, याचाही तपास करायला हवा.” त्यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त करताना म्हटले की, “राजकीय नेत्याच्या घरातील चोरी असल्याने पोलिसांसाठी हा सन्मानाचा प्रश्न आहे. मला खात्री आहे की पोलिस लवकरच ही चोरी उघडकीस आणतील.”

सध्या या चोरीप्रकरणामुळे जळगाव आणि राज्यातील राजकीय वर्तुळात(pen drive) खळबळ माजली आहे. या सीडी आणि कागदपत्रांमध्ये नेमके काय होते आणि चोरीमागील हेतू काय होता, याची चर्चा रंगत असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.

हेही वाचा :

अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत की नाही?
काजोलच्या आधी ही प्रसिद्ध अभिनेत्री होती अजय देवगणची एक्स गर्लफ्रेंड..
भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी…