सोन्याच्या दागिन्यांनंतर आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम(rules) लागू होणार आहे. केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चांदीचे दर ₹1,20,000 वर पोहोचले असून, यामुळे बाजारात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BIS चे सहा शुद्धता मानक :
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने चांदीसाठी 6 शुद्धता मानक निश्चित केले आहेत –
800, 835, 900, 925, 970 आणि 990.

प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्यावर आता एक 6 अंकी युनिक HUID कोड असेल. या कोडमुळे ग्राहकांना दागिन्याची शुद्धता आणि अस्सलपणा तपासता येईल.

सुरुवातीला ऐच्छिक, नंतर बंधनकारक? :
सप्टेंबरपासून हा नियम (rules)सुरुवातीला ऐच्छिक असेल. म्हणजेच ग्राहकांना हॉलमार्क असलेली किंवा नसलेली चांदी खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. पण तज्ञांच्या मते, हळूहळू ग्राहक हॉलमार्क असलेल्या दागिन्यांनाच प्राधान्य देतील. भविष्यात सोन्याप्रमाणेच चांदीवरही हॉलमार्किंग अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना होणारा फायदा :

– बाजारातील भेसळयुक्त दागिन्यांवर आळा बसेल.

– BIS Care App द्वारे HUID कोड तपासता येईल.

– खरेदीदाराला शुद्धतेची खात्री मिळेल आणि पैशाचे योग्य मूल्य मिळेल.

– ज्वेलरी उद्योगात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होईल.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल