अभिनेत्री काजोलच्या नावावर या एचडीएफसी बँकेच्या(account) शाखेत ना एफडी, ना खातं, ना म्युच्युअल फंड आहे तरीही तिला दर महिना जवळपास सात लाख रुपये या शाखेकडून का दिले जातात? नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात.अभिनेत्री काजोल ही सध्या ‘टू मच विथ काजोल आणि ट्विंकल’ या चॅट शोमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमांमधील विधानं आणि चर्चांमुळे काजोल, ट्विंकल ही जोडगोळी सोशल मीडियावरही चर्चेत असते. घरातूनच अभिनयाचे धडे गिरवत लहान वयापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रीय झालेल्या काजोलने ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘करण-अर्जुन’सहीत इतर अनेक चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अजय देवगणसारखा सक्रीय अभिनेता आयुष्यभराचा जोडीदार असतानाही काजोलने आपली वेगळी ओळख अगदी आजपर्यंतही कायम राखली आहे, ही बाब फारच खास म्हणावी लागेल. अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी काजोल ही आजही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र काजोल केवळ अभिनयामधून अर्थार्जन करत नाही.काजोलने मागील अडीच दशकांहून अधिक काळापासून मनोरंजनसृष्टीमधून कमवलेला पैसा वेगवेगळ्या माध्यातून गुंतवला असून यात रिअल इस्टेट प्रॉपर्टींचाही समावेश आहे. अशीच एक मोठी गुंतवणूक आता काजोलने एनकॅश करायचं ठरवलं आहे.

मुंबईमधील गोरेगावमधील ‘भरत अराईस’ या इमारतीमधील आपल्या मालकीचा एक मोठा गाळा काजोलने देशातील पहिल्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसीला(account) भाडेतत्वावर दिली आहे. काजोल आणि एचडीएफसीमध्ये हा करार 9 वर्षांच्या कालावधीसाठी झाला आहे. या कराराच्या माध्यमातून काजोल कोट्यवधी रुपयांची कमाई करणार आहे.काजोल आणि एचडीएफसी बँकेदरम्यान या जागेचा करार 14 नोव्हेंबर 2025 रोजी झाला आहे. करारासाठी केवळ स्टॅम्प ड्युटीच 5.61 लाखांची भरण्यात आली आहे. 30 हजारांची रजिस्ट्रेशन फीसुद्धा देण्यात आली आहे.

काजोलने हा 1817 स्वेअर फुटांचा मोठा गाळा मार्च 2025 मध्ये 28 कोटी 78 लाख रुपयांना विकत घेतला होता. या प्रॉपर्टीसोबत कार पार्किंगही देण्यात आल्यात, हे विशेष! काजोलने या करारदरम्यान एचडीएफसी बँकेकडून 27.61 लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणजेच सिक्युरीटी डिपॉझीट म्हणून घेतली आहे. विशेष म्हणजे, भाड्यामध्ये दर तीन वर्षांनी मोठी वाढ होणार असल्याची अट करारत आहे. कराराच्या पहिल्या तीन वर्षांसाठी बँक काजोलला दरमहा 6 लाख 90 हजार रुपये इतके भाडे देईल. यानंतर, पुढील तीन वर्षांसाठी भाड्यात 15 टक्कांनी वाढ होईल. त्यामुळे मासिक भाडे 7 लाख 99 हजार इतकं होईल.तसेच, शेवटच्या तीन वर्षांसाठी पुन्हा 15 टक्के वाढीनंतर बँक तिला दरमहा 9 लाख 13 हजार रुपये इतके भाडे बँक काजोलला देईल. अशाप्रकारे, नऊ वर्षांच्या कालावधीत काजोल भाड्यातून एकूण 8 कोटी 60 लाख रुपये कमवणार आहे.

हेही वाचा :

‘उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं…’, ‘यू-टर्न घेणारे राज…
पलाशचे फ्लर्टिंगचे मेसेजेस व्हायरल! मेरी डिकोस्टाने केला मोठा गौप्यस्फोट
कधी बहीण, कधी बायको, सलग 5 वर्षे अत्याचार अन् एक नकार…