नाशिक : पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक आणि भाजप(political) नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यात निमसे यांच्या मारहाणीत गंभीर झालेल्या राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे निमसे हे फरार झाले आहेत.

नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात पोळ्याच्या दिवशी दोन गट आमनेसामने सामने आले होते. यात भाजपचे नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे यांचे कार्यकर्ते भिडले होते. दरम्यान निमसे यांच्याकडून धोत्रे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या हाणामारीचे व्हिडिओ(political) देखील व्हायरल झाले होते. या प्रकरणात नाशिकच्या आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. निमसे यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली.

दरम्यान घटनेतील मुख्य आरोपी असलेले उद्धव निमसे आणि त्यांचे काही साथीदार हे अद्याप फरार आहेत. जखमी राहुल धोत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यानंतर उद्धव निमसे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून योग्य ती कारवाई सुरू असून गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या घटनेत जोपर्यंत मुख्य आरोपी उद्धव निमसे अजूनही फरार आहे. मात्र धोत्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून निमसे यांना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही; अशी भूमिका धोत्रे यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. तर कालपासून मयत राहुल धोत्रेचे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन करत आहेत.

हेही वाचा :

आज सोनं स्वस्त झालं की महाग? आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे दर

Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात फोटो व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक वळणावर