हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी लवकर उठून चालणे, योग,(Benefits)व्यायाम किंवा ध्यान करणे अनेकांसाठी कठीण होते. व्यस्त जीवनशैली, थकवा आणि थंडीमुळे अनेकांना सकाळी ध्यान साधना करता येत नाही. मात्र, ज्यांना सकाळचा वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीचे ध्यान अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनात मनावरचा दडपण वाढत चालले आहे. सततची धावपळ, ताणतणाव, अस्थिरता यामुळे मानसिक थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत ध्यान हे मनाला शांतता देणारे, भावनांना संतुलित ठेवणारे आणि एकाग्रता वाढवणारे प्रभावी साधन ठरते. ध्यानामुळे मन स्थिर होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि निर्णयक्षमता सुधारते. विद्यार्थ्यांसाठी तर ध्यान विशेष उपयुक्त मानले जाते, कारण ते स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवते.

ध्यानाचे परिणाम केवळ मानसिक स्तरावर नाहीत, तर शारीरिक आरोग्यालाही मोठा फायदा होतो. (Benefits)नियमित ध्यानामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब संतुलित राहतो आणि शरीरातील तणाव कमी होतो. तसेच रात्री ध्यान केल्याने मेलाटोनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारणारा सकारात्मक परिणाम दिसून येतो. स्नायू शिथिल झाल्यामुळे डोकेदुखी आणि मानसिक थकवा दूर होऊ शकतो.रात्रीच्या ध्यानासाठी खोलीत हलका अंधार, शांत वातावरण आणि आरामदायी स्थिती आवश्यक असते.

दीर्घ श्वास घेऊन श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत केले की शरीर-मनाला शांतता लाभते. (Benefits)ध्यानानंतर हलके संगीत ऐकल्यास मन पूर्णपणे रिलॅक्स होते आणि गाढ झोप येण्यास मदत होते.आरोग्यदायी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी ध्यान ही सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. दिवसात काही मिनिटं स्वतःसाठी काढून झोपण्यापूर्वी ध्यान केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी