पिशवीबंद दूध उकळण्याची खरंतर गरजच नसते. (packaged)यामागे एक वैज्ञानिक कारण सांगितले जाते. काय आहे ते कारण जाणून घेऊयात. तज्ज्ञ, डॉक्टर आणि डेअरी टॅक्नॉलॉजिस्ट यांच्या मते पिशवीबंद दूध उकळण्याची गरज नसते. पिशवीबंद दूध हे आधीपासूनच अल्ट्रा हाय टेंपचेजर पाश्चरीकरण प्रोसेस केलेले असते. त्यामुळं ही दूध किटाणुमुक्त आणि शुद्ध होऊनच घराघरात पोहोचले जाते. अशावेळी दूध उकळण्याची गरज नसते.

पिशवीबंद दूध सतत उकळल्याने त्यातील पोषक तत्वे कमी होतात.(packaged) दूध उकळल्याने त्यातील व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनची गुणवत्ता कमी होऊ शकते. पिशवीबंद दूध तुम्ही थेट पिऊ शकतात. दूध उकळल्याने केमिकल रिअॅक्शन होऊ शकते. दूधात असलेले लॅक्टोज आणि प्रोटीन यांच्यात केमिकल रिअॅक्शन होऊन दुधाचा रंग थोडासा पिवळसर होऊ शकतो तसंच, त्याची चवदेखील बदलू शकतो.

पिशवीबंद दूध तुम्ही किंचितसे गरम करु शकता. (packaged) दूध खूप वेळ फ्रीजच्या बाहेर राहिले असेल तर ते न उकळवून घेता थोडेसे गरम करा. तसंच, पिशवीबंद दूध नेहमी फ्रीजमध्येच ठेवा. फ्रीजमधील दूध तुम्ही 2 ते 3 दिवस वापरु शकता. पण जर तुम्ही डेअरीतून दूध घरी घेऊन येत असाल तर मात्र ते चांगले उकळवायलाच पाहिजे. कारण कच्चे दूध हे पचायला जड असते. यामुळं पोट बिघडू शकते.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट