सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ काही थांबताना दिसत नाहीये.(prices)कारण महागाई आणि मार्केटमधील चढ-उतार याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. चांदीची किंमतदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर अलवंबून असते. तसंच, सोन्याच्या दरातही आज वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात होणारी कपात आणि डॉलरची घसरण यामुळं सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तेजी आल्यानंतर चांदीचे दरांनी उच्चांक गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट चांदी 2.8 टक्क्यांनी वाढून 65.63 प्रति औंसवर पोहोचली आहे.(prices)पहिल्यांदा चांदीने 65 डॉलरचा आकडा पार केला आहे. तर, स्पॉट सोनं 0.4 टक्क्यांनी वाढून 4,321.56 प्रति औंसवर पोहोचलं आहे.बुधवारी MCX गोल्ड 5 फेब्रुवारीचा वायदा 1100 रुपयांनी कमी होऊन 1,33,373 रुपये 10 ग्रॅम इंट्राडे लोवर पोहोचला आहे. तर, MCX वर चांदीचा वायदा 5 मार्च 8000 हून अधिक वाढून 2,05,934 रुपये इंट्राड्रे उच्चांकावर पोहोचला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली असून 1,34,510 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,23,300 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 460 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,00,880 रुपयांवर पोहोचलं आहे.
चांदीचे दर
आज चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. चांदीचा प्रति ग्रॅम भाव आता ₹208 झाला आहे, जो कालच्या किमतीपेक्षा ₹8.90 ने वाढला आहे. 1 किलो चांदीचा भाव ₹208,000 झाला आहे, जो कालच्या किमतीपेक्षा ₹8,900 ने वाढला आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,23,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,34,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,880 रुपये - 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट(prices)12,330 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,451 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 10,088 रुपये
8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 98,640 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,07,608 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 80,704 रुपये

- मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,23,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,34,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,880 रुपये
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात