जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे,(passengers)रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते, त्याचप्रमाणे आता रेल्वेमध्ये देखील अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे.

रेल्वेमध्ये प्रवास करताना किती किलो वजनापर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो, (passengers)यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपण ट्रेनमधून जास्तीत जास्त किती वजनाच्या मर्यादेपर्यंत सामान फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकतो? याची मर्यादा पूर्वीपासूनच निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यापेक्षा अधिक जर सामान तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला तो रेल्वेच्या कोणत्या क्लासने प्रवास करणार आहे?(passengers) यावरून त्याच्याकडे जास्तीत जास्त किती सामान असायला हवं, याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही त्यापेक्षा अधिक सामान ट्रेनने घेऊन जाणार असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. तुम्ही जर रेल्वेच्या सेकंड क्लासने प्रवास करणार असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 35 किलोपर्यंतचं सामान मोफत घेऊन जाण्यास परवानगी असते. मात्र जर एखादा व्यक्ती सेंकड क्लासने प्रवास करत असेल तर जास्तीत जास्त 70 किलोपर्यंतचं सामान आपल्यासोबत ठेऊ शकतो. मात्र त्यासाठी त्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तर जे प्रवासी रेल्वेच्या स्लिपर क्लासने प्रवास करतात त्यांच्यासाठी (passengers)मोफत सामान घेऊन जाण्याची मर्यादा 40 किलोपर्यंत निश्चित करण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक सामान असेल तर अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.तर दुसरीकडे रेल्वेच्या एसीकोचसाठी ही मर्यादा जास्तीत जास्त 40 किलो आहे, त्यापेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. जर प्रवाशांकडे अतिरिक्त सामान असेल तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून त्याचा भार हा रेल्वे प्रशासनावर येतो. तसेच ट्रेनची साफ-सफाई करताना देखील अडचण होते, त्यामुळे हा नियम बनवण्यात आला आहे.

हेही वाचा :

केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या

महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार