सिगारेट ओढणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर खिशालाही महागात पडणार आहे.(cigarette)नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने सिगारेट, तंबाखू आणि पानमसाल्यावर कराचा बोजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४० टक्के जीएसटी लागू असलेल्या सिगारेटवर आता स्वतंत्र उत्पादन शुल्कही आकारले जाणार आहे.अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार १ फेब्रुवारीपासून सिगारेटच्या लांबीनुसार प्रति हजार काड्यांवर २,०५० रुपये ते ८,५०० रुपये इतके नवीन उत्पादन शुल्क लागू होणार आहे. हा कर सध्याच्या जीएसटीव्यतिरिक्त असेल. यामुळे सिगारेटवरील एकूण करभार लक्षणीय वाढणार असून त्याचा थेट परिणाम किमतींवर होणार आहे.

सध्या भारतात सिगारेटवर साधारणतः ५३ टक्के कर आकारला जातो,(cigarette) जो जागतिक आरोग्य संघटना ने सुचवलेल्या ७५ टक्के मानकांपेक्षा कमी आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि तंबाखू सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक नुकसान कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक २०२५ मंजूर करून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांवरील तात्पुरत्या आकारण्या रद्द केल्या होत्या. त्या ऐवजी कायमस्वरूपी कररचना लागू करण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून हे नवीन उत्पादन शुल्क आकारले जात आहे.

या निर्णयामुळे सिगारेटच्या किमती वाढणार असून देशभरातील लाखो (cigarette)धूम्रपान करणाऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे. तसेच आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया यांसारख्या प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यावरही दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र जास्त कर लादून तंबाखू सेवन कमी करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.आतापर्यंत तंबाखू आणि सिगारेटवर जीएसटी आणि भरपाई उपकर अशा दोन प्रकारे कर आकारला जात होता. तंबाखू उत्पादनांना ‘सिन टॅक्स’ म्हणजेच व्यसनाधीन व आरोग्यास घातक वस्तूंच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच इतर वस्तूंच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त कर लादला जात आहे. जीएसटीमुळे झालेल्या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्यांवर उपकरही आकारण्यात आला होता. आता या सर्वांमध्ये उत्पादन शुल्काची भर पडल्याने सिगारेटवरील कराचा एकूण बोजा आणखी वाढणार आहे.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य