USSD आधारित अनेक स्कॅम होताना दिसत आहे. यामुळे तुमचं (observed) संपूर्ण बँक खाते रिकामं होऊ शकते. तुमच्यासोबत असं होऊ नये यासाठी तुम्ही अलर्ट राहणे गरजेचं आहे. सध्या डिलिव्हरी एजंटच्या नंबरचा स्कॅम सुरु आहे. जर तुम्हाला एखाद्या डिलिव्हरी एजंटचा फोन येऊन -21- ने सुरू होणारा नंबर डायल करण्यास सांगितले, तर ते अजिबात करू नका. हा फोन करणारा डिलिव्हरी एजंट नसून सायबर फसवणूक करणारा असण्याची दाट शक्यता आहे. असा नंबर डायल केल्यास तुमच्या मोबाईलवरील सर्व कॉल स्कॅमरच्या नंबरवर फॉरवर्ड होऊ शकतात.

भारत सरकारने USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग स्कॅमबाबत (observed) नागरिकांना सतर्क केले आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत I4C कडून यासंदर्भात अधिकृत इशारा जारी करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी नवा मार्ग शोधला असून, ते स्वतःला डिलिव्हरी एजंट म्हणून ओळख देत लोकांची फसवणूक करत आहेत. या पद्धतीने ते थेट बँक खाते रिकामे करू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे.USSD कोडमध्ये साधारणपणे (*) आणि (#) चिन्हे असतात. इंटरनेटशिवाय टेलिकॉम सेवांशी संपर्क साधण्यासाठी हे कोड वापरले जातात. सायबर गुन्हेगार या कोडचा गैरवापर करून पीडिताच्या फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग सक्रिय करतात.
फसवणूक करणारे स्वतःला डिलिव्हरी कंपनीचे कर्मचारी म्हणून (observed) सादर करतात. पार्सलची तारीख निश्चित करणे किंवा बदलण्याच्या बहाण्याने ते संपर्क साधतात. यानंतर पीडिताला एक SMS पाठवला जातो, ज्यामध्ये -21- ने सुरू होणारा USSD कोड आणि एक मोबाईल नंबर असतो — जो प्रत्यक्षात स्कॅमरचाच असतो. हा कोड डायल केला की पीडिताच्या फोनवरील सर्व इनकमिंग कॉल स्कॅमरकडे वळतात.
बँक खाते कसे रिकामे होते?
एकदा कॉल फॉरवर्डिंग सुरू झाली की —
बँकेकडून येणारे कॉल
व्यवहारासाठी येणारे OTP
WhatsApp, Telegram यांसारख्या अॅप्सचे व्हेरिफिकेशन कोड
हे सर्व थेट स्कॅमरच्या फोनवर जातात. याच माध्यमातून(observed) ते बँक खात्यातील पैसे काढतात किंवा सोशल मीडिया अकाउंट हॅक करतात.
सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
कोणत्याही अनोळखी व्यक्तीने सांगितलेले -21-, -61-, -67- किंवा तत्सम USSD कोड कधीही डायल करू नका. चुकून कॉल फॉरवर्डिंग सुरू झाली असल्यास ती तात्काळ बंद करण्यासाठी ##002 डायल करा हा कोड सर्व प्रकारची कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करतो

‘हे’ ही लक्षात ठेवा
SMS, WhatsApp किंवा ईमेलवर आलेल्या संशयास्पद (observed) डिलिव्हरी लिंकवर क्लिक करू नका. कोणताही फसवणूक करणारा अॅप किंवा स्कॅम आढळल्यास त्वरित 1930 या क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश