ब्रोकली ही हिरवी आणि पोषक तत्वांनी युक्त भाजी आहे .(weight) ही भाजी अनेकांच्या डाएट प्लॅनमध्ये भाव खाऊन जाते. ही क्रुसिफेरस या पालेभाज्या कुटुंबातील आहे. ती प्रथिने आणि इतर गुणांनी युक्त आहे. ब्रोकलीत विटामिन्स,मिनरल्स आणि फायबरचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषण मिळते. ब्रोकलीचे नियमीत सेवन केल्यास शरिराला मोठा फायदा होतो. शरिराला संतुलित आहार मिळतो. ज्यांना फिट आणि सक्रिय राहायचे आहे ते ब्रोकलीचा त्यांच्या डाएटमध्ये रोज उपयोग करतात. पोषण तज्ज्ञ ब्रोकली डाएट प्लॅनमध्ये घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराला दीर्घकाळ आरोग्यदायी आणि ऊर्जादायी वाटतं.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ब्रोकली तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये मेद कमी आणि फायबर अधिक असते. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. (weight)अनावश्यक खाणं टाळल्या जाते. अँटिऑक्सिडेंट मेटाबॉलिज्म लवकर होते. त्यामुळे वजन झटपट कमी होते. वजन वाढत नाही. तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.ब्रोकलीमधील फायबर रक्तातील शर्करा संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासह मधुमेहींसाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते. नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यास मदत होते. रक्तातील शर्करा वाढत नाही. ही भाजी नियमित खाल्ल्यास मधुमेहींना मोठा फायदा होतो.

ब्रोकलीतील पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंटमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.(weight) वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. संशोधनानुसार, ब्रोकलीचे सेवन हृदय रोग आणि हृदय रोगाचा झटका येण्याचा धोका अत्यंत कमी करतो. यामधील ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.कॅल्शियम आणि व्हिटामिन K ची भरपूर मात्रा असलेली ब्रोकली ही हाडं मजबूत ठेवण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. तर ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या कमी होतात. मुलं,महिला आणि वयोवृद्धांसाठी ही भाजी सर्वात चांगली मानली जाते. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी पण ब्रोकली आरोग्यदायी मानली जाते.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश