जिओ कंपनीने आपल्या देशभरातील ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय.(users)जी पूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लानमधून ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. हा प्लान जियोच्या 50 कोटींहून अधिक यूजर्सना खूश करणारा आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या या योजनेत अधिक फायदे मिळतात. ज्यामुळे यूजर्से त्याकडे आकर्षित होतायत. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो, जो पूर्ण वर्षासाठी एकूण 912 जीबी इतका होतो. यातून व्हिडिओ पाहणे, गाणी ऐकणे, सोशल मीडियावर ब्राउझिंग करणे आणि ऑनलाइन काम करण्यास मदत होणार आहे. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतरही सेवा सुरू राहते. पण स्पीड कमी होऊ शकते. ही योजना डेटा-प्रेमी यूजर्ससाठी खास आहे. कारण यात अनलिमिटेड डेटा वापराची संधी मिळते.

या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलमिटेड मोफत कॉलिंग मिळते, (users)जी पूर्ण 365 दिवसांसाठी वैध आहे. म्हणजे कोणत्याही कंपनीच्या नंबरवर कितीही वेळ बोलता येईल, त्यासाठी अतिरिक्त शुल्क देण्याची नाही. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस पाठवता येतात. या प्लानध्ये जिओ होमची 2 महिन्यांची मोफत ट्रायल मिळते, जी होम एंटरटेनमेंटसाठी आहे. तसेच, जिओ हॉटस्टारची 3 महिन्यांची मोफत सबस्क्रिप्शन मिळते, ज्यात सिनेमा, सीरियल आणि स्पोर्ट्स पाहता येतात. जिओ टीव्हीच्या माध्यमातून टीव्ही चॅनेल्स मोफत पाहता येतात.
या प्लानमुळे यूजर्ना वर्षभराच्या रिचार्जचे टेंशन जाते आणि पैशांची बचत करते. (users)इतर प्लानच्या तुलनेत ती अधिक परवडणारी आहे. कारण यात एकूण खर्च कमी होतो. जिओच्या विस्तारित पोर्टफोलिओचा भाग असल्याने यूजर्संना निवडीची स्वातंत्र्य मिळते. ज्यांना सतत रिचार्ज करण्याची वेळ नसते, त्यांच्यासाठी हा प्लान खास ठरणार आहे.हा प्लान तुम्हाला 3599 रुपयांमध्ये मिळणार आहे. जो एका वर्षासाठी खूपच कमी आहे. यात तुम्हाला 365 दिवसांची वॅलिडीटी मिळते. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर कोणत्याही चिंतेशिवाय सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. यात ग्राहकांना दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. जिओच्या इतर प्लानमध्ये 56,84,90,98,200 आणि 336 दिवसांच्या वॅलिडीटी प्लान आहेत.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश