सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत (YouTube) असतात. मात्र अलीकडे एक रहस्यमयी व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवली. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दावा करण्यात आला आहे की हा व्हिडिओ तब्बल 140 वर्षे चालणारा व्हिडिओ आहे. 140 वर्षांचा व्हिडिओ म्हणताच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. चला या व्हिडिओत नक्की काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हा व्हिडिओ ५ जानेवारी २०२६ रोजी नावाच्या युट्युब चॅनेलवरून अपलोड (YouTube)करण्यात आला होता. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करताच काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. शीर्षक आणि थंबनेलवरून कळते की स्क्रीन १४० वर्षांचा कालावधी दाखवते. जर एखाद्याने तो खरोखरच संपूर्णपणे पाहिला तर एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य देखील पुरेसे ठरणार नाही. यामुळेच हा व्हिडिओ खळबळजनक बनतो.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्हिडिओमध्ये कोणतीही प्रतिमा किंवा आवाज नाही. (YouTube)तो फक्त एक काळी स्क्रीन दाखवतो. प्ले बटण दाबल्यावर, तो काही तासांत संपतो, परंतु थंबनेल टॅग तो 140 वर्षे जुना असल्याचे दर्शवितो. डिझाइन आणि लांबीबद्दलचा हा गोंधळ इंटरनेटवर एक प्रमुख मुद्दा बनला आहे. वर्णन देखील सर्वात जास्त चर्चेत आहे. व्हिडिओ वर्णनात अरबी चिन्हे आहेत, ज्यांचे भाषांतर “ये, मला नरकात भेटा” असे होते. हा संदेश वाचताच लोक घाबरली तर काही गोंधळून गेली. दरम्यान व्हिडिओतील आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे व्हिडिओचे चॅनेल लोकेशन हे उत्तर कोरियातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे इंटरनेटवर वापरण्यावर फारसे स्वातंत्र्य नाही. व्हिडिओने लोकप्रियता मिळवल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहीजण याला तांत्रिक प्रयोग मनात आहेत तर काहींनी याला युट्युबचा एक ग्लिच असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश