देशभरातील ‘पीएफ’ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (withdraw)आता त्यांना त्यांचा ‘पीएफ’ काढण्यासाठी प्रदीर्घ अन् किचकट प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नसेल. कारण, ईपीएफओ एक अशी प्रणाली आणत आहे, जी यूपीआयद्वारे पेमेंट करण्याइतकीच पीएफ काढणे सोपे करेल.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ पुढील दोन ते तीन महिन्यांत यूपीआय-आधारित पीएफ काढण्याची प्रणाली सुरू करण्याची तयारी करत आहे. यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने एक संपूर्ण तांत्रिक चौकट विकसित केली जात आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत, पीएफ खातेधारक कोणत्याही यूपीआय अॅपवरून थेट पैसे काढण्याच्या रिक्वेस्ट सबमिट करू शकतील.

रिक्वेस्ट सबमिट होताच, ईपीएफओ सिस्टम बॅकएंडमधील आधार क्रमांक,(withdraw) बँक खाते आणि पीएफ खात्याची माहिती ऑटोमॅटिक पडताळेल. जर सर्व तपशील बरोबर असल्याचे आढळले तर, दाव्याची प्रक्रिया त्वरित पुढे जाईल. यामुळे केवळ वेळ वाचणार नाही तर फॉलोअप घेणे देखील खूप सोपे होईल.प्राप्त माहितीनुसार, भीम अॅपवर पहिल्या टप्प्यात ही सुविधा सुरू केली जाऊ शकते. सुरुवातीला पूर्ण पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
परंतु एक निश्चित मर्यादा निश्चित केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या (withdraw)यूपीआय नियमांना लक्षात घेऊन ही मर्यादा निश्चित केली जाऊ शकते.याशिवाय जर ही नवीन प्रणाली सुरळीतपणे काम करू लागली आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरवपार झाला नाही, तर भविष्यात फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या प्रमुख यूपीआय प्लॅटफॉर्मवर देखील ही सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश