आपल्या शरीरात अनेक छोटे-छोटे बदल होत असतात.(fingernails) अनेकदा या बदलांकडे आपण किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. तुम्ही अनेकदा काही लोकांच्या किंवा तुमच्या नखांवर काळी किंवा तपकिरी रेघ पाहिली असेल. पण नखांवर दिसणारी ही छोटी रेघ कॅन्सरचं लक्षण ठरू शकते.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नखांवर दिसून येणारी रेघ त्वचेच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिच्या नखांचा फोटो शेअर केला. ज्यामुळे लोकांनी तिला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.

नखांवर दिसून येणारी हलक्या काळ्या रेघेला वैद्यकीय भाषेत(fingernails)मेलेनोमा असं म्हणतात. ही रेघ विरळ ते गडद असू शकते. या रेषा हात किंवा पायाच्या नखांवर दिसून येऊ शकतात. काहींना जन्माच्या वेळी देखील अशी रेष दिसून येऊ शकते.
बऱ्याचदा नखांवर दिसून येणाऱ्या काळ्या रेषा गंभीर आजाराचं लक्षणं असतील असं नाही. अनेकदा त्या सामान्य कारणांमुळे असू शकतात. जसं की नखांना दुखापत होणं, पौष्टिक घटकांचा अभाव, विशिष्ट औषधांचे परिणाम आणि हार्मोनल बदल. ज्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग गडद असतो त्या व्यक्तींमध्ये नखांवर अशा रेषा दिसून येणं सामान्य असतं. याच कारणामुळे बरेच लोक ते गांभीर्याने घेत नाहीत.जर ही काळी रेघ तुमच्या फक्त एका नखावर असेल किंवा हळूहळू खोल आणि मोठा होत असेल तर ते चिंतेचं कारण असू शकतं. काही प्रकरणांमध्ये तो Subungual मेलेनोमा नावाच्या त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जो नखेखाली होतो आणि तो खूप धोकादायक ठरतो.

ही लक्षणं गंभीर आजारांचे संकेत
नखं तुटणं

नखांचा आकार विचित्र पद्धतीने वाढणं

नखांच्या जवळ सूज येणं

नखांच्या खाली गाठ येणं

जखम किंवा रक्त येणं

अनेकदा अशी लक्षणं दिसली की डॉक्टर अनेकदा बायोप्सीची शिफारस करतात. (fingernails)कारण फक्त साध्या तपासणीने यांचं निदान करू शकत नाही. तज्ज्ञांच्या म्हणतात की, एकाच वेळी दोन नखांमध्ये कॅन्सर होणं दुर्मिळ असलं तरी त्याची चाचणी घेणं सुरक्षित आहे. लवकर निदान झाल्यास जीव वाचू शकतात.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश