महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना (shocked) अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आपल्या वॉर्डमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकाला नेमकं किती मानधन मिळतं? देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मोठा आहे. मात्र, या अवाढव्य प्रशासनाचा कारभार सांभाळणाऱ्या नगरसेवकांच्या खिशात प्रत्यक्षात किती पैसे जातात, हे फार कमी लोकांना माहीत असतं.नगरसेवक हा सरकारी कर्मचारी नसल्यामुळे त्याला नियमित पगार मिळत नाही. त्याऐवजी त्यांना दरमहा मानधन दिलं जातं. मुंबई महापालिकेतील एका नगरसेवकाला साधारण 25,000 ते 30,000 रुपये दरमहा मानधन मिळतं. याशिवाय महापालिकेच्या बैठकींना उपस्थित राहिल्यावर किरकोळ भत्ता दिला जातो. पाहता पाहता ही रक्कम मध्यमवर्गीय नोकरीपेक्षा कमीच वाटते.

नगरसेवकांना अधिकृत स्वरूपात बेस्ट बसचा मोफत पास,(shocked)मोबाईल बिल भत्ता आणि वैद्यकीय विमा सुविधा मिळते. मात्र प्रत्यक्षात बहुतांश नगरसेवक खासगी गाड्यांतून प्रवास करताना दिसतात. महापौर आणि उपमहापौरांसारख्या पदाधिकाऱ्यांना बंगला, वाहन आणि सुरक्षा व्यवस्था दिली जाते. त्यामुळे सुविधांमध्ये मर्यादा असल्या तरी त्यांचे अधिकार मोठे असल्याचे स्पष्ट होते.नगरसेवकांच्या खऱ्या ताकदीचा स्रोत म्हणजे त्यांच्या हातातील निधी आणि निर्णयक्षम अधिकार. वॉर्डातील विकासकामांवर त्यांची सही लागल्याशिवाय कोणतंही काम पुढे सरकत नाही. त्यामुळेच नगरसेवकांचा प्रभाव पगारापेक्षा त्यांच्या अधिकारांमुळे अधिक जाणवतो.
प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला साधारण 1 ते 1.5 कोटी रुपयांचा स्वेच्छा (shocked)निधी दिला जातो. या निधीतून रस्ते, गटारे, उद्याने, पथदिवे, पाणीपुरवठा यासारखी विकासकामं केली जातात. याशिवाय मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेच्या मुख्य बजेटमधून अतिरिक्त निधी मिळवण्याची ताकदही नगरसेवकाकडे असते एका वॉर्डमध्ये साधारण 50 ते 60 हजार लोकसंख्या असते. या संपूर्ण भागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या आणि विकासकामांवर नगरसेवकांचा थेट प्रभाव असतो. त्यामुळे 25-30 हजार रुपयांच्या मानधनासाठी नव्हे, तर सत्ता, प्रभाव आणि निर्णयक्षमतेसाठीच उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणूक लढवतात, असं चित्र दिसून येतं.
ही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश