कोल्हापूरकर चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या पावसाच्या सरी रविवारी शहरात रिमझिमल्या. सृृजनाची वाट सुकर करणाऱ्या या सरींनी शहर काही मिनिटांतच ओलेचिंब झाले. शहरात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यासह शहरात तुरळक पावसाची नोंद झाली. इचलकरंजी, जयसिंगपुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. (Rain )हवामान विभागाने मंगळवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण भागात मान्सूनने एंट्री केली आहे. (Rain)त्यामुळे गेल्या २४ तासांत चंदगड तालुक्यात सर्वाधिक सरासरी १४.३ मि.मी. पाऊस झाला. हळूहळू नैऋत्य मोसमी वारे जिल्हा व्यापत असल्याने सर्वदूर मान्सूनचे वातावरण झाले आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी नभ दाटून आल्याने जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. रात्री ८ च्या सुमारास शहरात पावसाच्या सरी बरसू लागल्या. काही वेळात सरींनी जोर पकडला. उपनगरांमध्येही मध्यम सरी बरसल्या. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात चंदगड, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. कुंभी, पाटगाव, चित्री, आंबेओहोळ धरण क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
इचलकरंजी, जयसिंगपूरला तडाखा; अनेक घरांत पाणी इचलकरंजीसह परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागात पाणी साचलेे. (Rain) काही ठिकाणी नव्याने बांधलेल्या नियोजनशून्य गटारींमुळे लालनगर, पाटील मळा, चांदणी चौक, गणेशनगर यांसह काही भागात घरांमध्ये पाणी शिरले.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’