महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.(earthquake) ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरून केलेल्या वक्तव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार सत्ता सोडून मविआसोबत येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची मने जुळली आहेत, त्यानंतर महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढत आहेत.(earthquake) याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी अजित पवार मविआसोबत येतील, असा दावा केला.

अजित पवारांवरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. (earthquake) महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्यानंतर खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी जोरदार पलटवार करत, संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन लागलं असल्याची टीका केली आहे.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद