राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (release)अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आता त्यांची ईडीकडूनही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याआधी एसीबीकडून त्यांना क्लिनचीट देण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही त्यांना दिलासा दिल्याने भुजबळ समर्थकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.या प्रकरणामुळे अनेक वर्षे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात संघर्षाचा सामना करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. ईडीच्या या निर्णयामुळे त्यांच्या विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना देखील मोठा धक्का बसला असून, राजकीय चर्चांमध्ये पुन्हा एकदा भुजबळ यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

छगन भुजबळ आणि इतर आरोपींकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात (release)निर्दोष मुक्ततेसाठी ईडीकडे अर्ज करण्यात आला होता. ईडीने हा अर्ज मंजूर करत भुजबळ यांना या प्रकरणातून पूर्णतः दिलासा दिला आहे. याआधीच एसीबीकडून दोषमुक्ती मिळाल्यानंतर ईडीकडूनही क्लिनचीट मिळाल्यामुळे आता या प्रकरणावर जवळपास पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे.या निर्णयामुळे भुजबळ यांचा राजकीय प्रवास पुन्हा वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये ते अधिक सक्रिय भूमिका बजावतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः आगामी राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात अफरातफर झाल्याचा आरोप (release)छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथित घोटाळ्याची रक्कम सुमारे ८५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात होतं. या प्रकरणात भुजबळ यांच्यासह एकूण १४ जणांवर आरोप करण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांना दोन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला होता.मात्र त्यानंतर तपास प्रक्रियेत पुराव्याअभावी एसीबीकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता ईडीनेही त्यांचा अर्ज मंजूर केल्याने या प्रकरणात त्यांना पूर्ण दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असून, भुजबळ यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद