लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.(workers) अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही.दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २६ लाख महिलांना केवायसीनंतरही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केवायसी करुनही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा ईकेवायसीमुळे लाभ बंद झाला आहे.(workers). त्यांची यादी आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. आता यासाठी अंगणवाडी सेविकांचे काम सुरु झाले आहे. अंगणवाडी सेविका महिलांची घरोघरी जाऊन पडताळणीदेखील करत आहेत.लाडकी बहीण योजनेत केवायसीमुळे ज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत. त्यांची यादी अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झाली आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांच्या पत्त्यावर जाऊन त्यांची पडताळणी करणार आहेत. त्या खरंच पात्र आहेत का हे चेक करणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांकडे वंचित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. .(workers)या यादीनुसार महिलांची पडताळणी करणार आहे. त्या त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे ही यादी सोपवण्यात येणार आहे.त्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे. दरम्यान, जर काही अडचण आली तर घाबरुन न जाता महिलांनी अंगणवाडी केंद्रात भेट द्यायची आहे, असं सांगितलं आहे.

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी