2026 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी होणार असून या घटनेबाबत (eclipse) जगभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे असणार असून ग्रहणावेळी सूर्य पूर्णपणे झाकला जाऊन त्याच्या कडेला प्रकाशाचे वलय दिसणार आहे. या दुर्मिळ दृश्यामुळे खगोलशास्त्रज्ञांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. सूर्यग्रहणादरम्यान दिवसा काही काळ अंधार पसरतो, त्यामुळे हा अनुभव पाहण्यासाठी अनेक जण विशेष तयारी करत आहेत.

हे सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येच्या दिवशी होणार असून खगोलशास्त्रीय (eclipse) दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणकाळात सूर्याच्या बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळते. त्यामुळे जगभरातील संशोधन संस्था या काळात विविध प्रयोग आणि निरीक्षणे करणार आहेत. कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात दुपारी 3.26 वाजता होईल, तर सायंकाळी 5.12 वाजेपर्यंत सूर्य पूर्णपणे झाकला जाईल. संपूर्ण ग्रहण प्रक्रिया सायंकाळी 7.57 वाजता संपणार आहे.
मात्र, सर्वांनाच हे दृश्य अनुभवता येणार नाही. हे सूर्यग्रहण (eclipse) अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग, चिली आणि अर्जेंटिना येथेच स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे येथे दिवसा अंधार पडणार नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांची उत्सुकता काहीशी कमी झाली असली तरी या दुर्मिळ खगोलीय घटनेचे फोटो, व्हिडीओ आणि थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मात्र उपलब्ध असणार आहे. थेट अनुभव घेता येणार नसला तरी 17 फेब्रुवारी 2026 चे हे सूर्यग्रहण खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढप