सोन्या-चांदीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. दिवसागणिक (prediction)सोने-चांदी महाग होत आहे. त्याचवेळी बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने सोन्याविषयी, सोने दराविषयी मोठे भाकीत केले आहे. हा भाव ऐकून अनेकांन धक्का बसला आहे. कारण वेंगाच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. सोन्याचा भाव किती वाढणार, किंमत किती वाढणार याविषयी वेंगाने मोठे भाकीत केले आहे. त्याची आता समाज माध्यमांवर चर्चा सुरू आहे. काय आहे तिचे ते अचंबित करणारे भाकीत?

बाबा वेंगाची सोन्याच्या किंमतीविषयीची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे.(prediction) समाज माध्यमात हे भाकीत तुफान चर्चेत आले आहे. सोन्याच्या किंमती सध्या सुसाट आहे. पण वेंगाच्या भाकि‍ताने अनेकांच्या कपाळाला आठ्या आल्या आहेत. तर ज्यांच्याकडे भरपूर सोने आहे, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. बाबा वेंगाला बाल्कन क्षेत्रातील नास्त्रेदमस असे म्हटले जाते. तिची भविष्यवाणी खूप चर्चेत आहे. तिचा जन्म बुल्गेरियात 1911 मध्ये झाला होता. तर वयाच्या 86 व्या वर्षी तिचे 1996 मध्ये निधन झाले होते.

गेल्या काही महिन्यात सोन्याची चमक वाढली आहे. सोन्याच्या ताज्या भावाने (prediction) गुंतवणूकदारांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 1 लाख 47 हजार रूपयांपर्यंत पोहचला आहे. त्याचदरम्यान बाबा वेंगाच्या त्या भाकि‍ताची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरणार का?

बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, आर्थिक संकट हे पारंपारिक बँकिंग प्रणाली प्रभावित करू शकते. त्यामुळे अनेक लोक सोने आणि चांदीत अधिकाधिक गुंतवणूक करतील. थोडं का होईना सोने खरेदी करतील. चांदीत गुंतवणूक करतील. बाबा वेंगानं केलेल्या भाकितानुसार, सोन्याच्या किंमती जवळपास 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या सोने दीड लाखांच्या घरात आहे. ही किंमत दोन लाखांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश