ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः (period) मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य, पराक्रम, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता यांचा कारक मानले जाते. १६ जानेवारी २०२६ रोजी मंगळ ग्रह मकर राशीत प्रवेश करणार असून ही स्थिती मंगळासाठी अत्यंत शुभ आणि उच्च मानली जाते. त्यामुळे या ग्रह संक्रमणाचा प्रभाव सर्वच राशींवर जाणवणार असला, तरी काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मंगळ मकर राशीत उच्च स्थितीत असल्याने मेहनत, शिस्त, नेतृत्वगुण आणि धाडसी निर्णयांना बळ मिळते. करिअर, व्यवसाय, आर्थिक प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः पुढील काही महिन्यांमध्ये काही राशींच्या लोकांसाठी हा काळ ‘गोल्डन टाईम’ ठरू शकतो, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे संक्रमण अत्यंत लाभदायक ठरणार आहे.(period) करिअरमध्ये स्थैर्य येईल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता असून, जबाबदाऱ्या वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा आणि नवीन संपर्क मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चही वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन आवश्यक ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील, तर आरोग्य सामान्य राहील, जरी कधी कधी थकवा जाणवू शकतो.

सिंह राशीसाठी मंगळाचं हे संक्रमण प्रगती आणि नव्या संधी घेऊन येणारं ठरेल.(period) नोकरीत पदोन्नती, महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी किंवा नवीन संधी मिळू शकतात. योग्य निर्णय घेतल्यास आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि बचतीत वाढ होईल. आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर असल्याने कठीण कामंही सहज पार पाडता येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होण्याची शक्यता आहे.वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत प्रभावी ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या कठोर परिश्रमांचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. करिअरमध्ये प्रगती, सन्मान किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात सातत्याने नफा मिळू शकतो आणि आर्थिक स्थिती अधिक भक्कम बनेल. वैयक्तिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि आरोग्यही उत्तम राहण्याची चिन्हे आहेत.

मीन राशीसाठी पुढील काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. (period)उत्पन्नात वाढ होईल आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत मान्यता, बढती किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात विस्तार आणि नवीन करार होण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील, तर नातेसंबंधांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. मानसिक शांतता आणि सकारात्मकता टिकून राहील.एकूणच मंगळाच्या मकर राशीतील संक्रमणामुळे अनेक राशींसाठी यश, स्थैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश