राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Ajit Pawar यांच्या कथित विमान अपघातानंतर राज्यात (leader) शोककळा पसरली असली तरी त्यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं त्यांचं खासगी विमान बारामती विमानतळाजवळ कोसळल्याची माहिती समोर आली होती. अपघातानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि त्यात अजित पवार यांच्यासह आणखी चौघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून शोकभावना व्यक्त करण्यात आल्या.

मात्र काही दिवस उलटल्यानंतर या अपघाताबाबत (leader) विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे नेते Rohit Pawar यांनी या दुर्घटनेवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन हा केवळ अपघात नसून संभाव्य घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. सरकारी तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी दर्शवली आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांच्या (leader) प्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एका संस्थेला या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियावरूनही (leader) तीव्र भूमिका मांडली आहे. त्यांनी नमूद केलं की, घटनेला वीस दिवस उलटूनही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात Directorate General of Civil Aviation कडून प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करून विमान सेवा चालवत असल्याचा आरोप असलेल्या VSR कंपनीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाविषयी संशय अधिक बळावत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.या पार्श्वभूमीवर आता खासगी तपास यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अपघात की घातपात या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचंही लक्ष केंद्रीत झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या या घटनेचं सत्य लवकरात लवकर समोर यावं, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं