भारताताली रोजगार बाजारपेठेत झपाट्याने बदल होत असल्याचं पहायला मिळत आहे. तरूणांना ऑनलाईन आणि इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी(job) शोधण्याच्या संधी वाढत आहेत. मात्र या वाढत्या संधीसोबत जोखीम आणि स्कॅम देखील वाढत आहेत. तरूणांना नोकरी शोधताना रोज अनेक घोटाळ्यांचा सामना करावा लागत आहे.

यामुळे त्यांचे आर्थिक आणि भावनिक नुकसान देखील होत आहे. यामुळे आता अनेकांचा आत्मविश्वास देखील कमी होत असल्याचं पाहयला मिळत आहे. याच सर्वांचा विचार करून आता लिंक्डइनने एक नवीन फीचर फीचर सादर केलं आहे. ज्याच्या मदतीने नोकरी घोटाळ्यांमध्ये होणारी वाढ रोखली जाणार आहे.
तज्ञांच्या मते, सर्वोत्तम संरक्षण म्हणजे दक्षता, जागरूकता आणि विश्वासार्ह साधने. या परिवर्तनामुळे गेल्या वर्षभरात भारतात लिंक्डइनवर सत्यापन स्वीकारण्याचे प्रमाण २.४ पट वाढले आहे, जेथे प्रोफेशनल्स कनेक्ट होताना, अर्ज करताना किंवा नियुक्ती करताना अधिक आत्मविश्वासाचा शोध घेतात.
प्रोफेशनल्सची सुरक्षितता आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने लिंक्डइनने ऑनलाइन परस्परसंवाद अधिक सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केलेली नवीन सत्यापन वैशिष्ट्ये लाँच केली आहेत: विस्तारित कंपनी पेज व्हेरिफिकेशन: हे फीचर आता अधिक व्यवसायांसाठी खुले करण्यात आले आहे. यामध्ये पेड प्रीमियम पेज सबस्क्रिप्शन असलेल्या लहान व्यवसायांचा समावेश आहे. ८५ टक्के व्यवसाय ग्राहकांचे असं म्हणणं आहे की, व्यवसाय करताना विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे.
रिक्रूटर वर्कप्लेस व्हेरिफिकेशन: ‘रिक्रूटर’ किंवा ‘टॅलेंट अॅक्विझिशन स्पेशालिस्ट’ सारख्या रिक्रूटर जॉब टायटल जोडणाऱ्या किंवा अपडेट करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये टायटल जोडण्यापूर्वी त्यांच्या कामाच्या ठिकाणाची पडताळणी करणे आवश्यक आहे. यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना असा विश्वास निर्माण होतो की, ते खऱ्या प्रोफेशनल्सशी संवाद साधत आहे. त
कार्यकारी पदाचे सत्यापन: नेतृत्वाची तोतयागिरी रोखण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांची पडताळणी आवश्यक असेल. लिंक्डइनच्या विद्यमान सुरक्षा पायाभूत सुविधांवर आधारित है वैशिष्ट्ये युजर्ससाठी अत्यंत आवश्यक आहेत. या वैशिष्ट्यांच्या मदीतने बनावट खाती आणि घोटाळे नोंदवण्यापूर्वीच ब्लॉक होतात. ज्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांचा प्लॅटफॉर्मवरील विश्वास टिकून राहतो.

नोकरी(job) शोधताना तंत्रज्ञानासोबतच जागरूकता देखील तितकीच महत्त्वाची आहे. लिंक्डइन इंडियाच्या लीगल अँड पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख अदिती झा यांनी रोजगार शोधताना सुरक्षितता बाळगण्यासाठी काही टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे.
- ऑनबोर्डिंग करण्यापूर्वी तुमचे बँक डिटेल्स शेअर करणं टाळा
- तुम्हाला काही संशायस्पद वाटत असेल तर थांबा, कोणतेही एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका
- अधिक जास्त पैसे ऑफर करणाऱ्या आणि मोठ्या पदांचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरांतीपासून सावध राहा
- खाते सेटिंग्ज अपडेट ठेवा
- नोकरी शोधताना लिंक्डइनच्या सुरक्षा फीचर्सचा वापर करा
- कंपनीने शेअर केलेल्या जॉब पोस्टरची सत्यता नेहमी तपासा
- लिंक्डइन त्यांच्या युजर्सना घातक आणि स्पॅम मॅसेजपासून सावध राहण्यासाठी वेळोवेळी वॉर्निंग्ज जारी करत असते
- तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासकी सेट करा
- टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता टिकून राहते
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार?
नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक