चॉकलेट असो किंवा इतर कोणतेही पदार्थ लहान मुलांपासून गोडाचं खाणं लपवलं जातं.(chocolate) पण तुम्हाला माहितेय का गोड खाण्याचे सुद्धा शरीराला अनेक फायदे होतात, नेमके कोणते होतात ते जाणून घेऊयात.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना गोड पदार्थ म्हटले की, तोंडाला पाणी सुटतं.(chocolate) खरंतर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की गोड खाऊ नये. लहान मुलांना देखील जास्त गोड खाल्याने पोटात जंत होतात. त्यामुळे चॉकलेट असो किंवा इतर कोणतेही पदार्थ लहान मुलांपासून गोडाचं खाणं लपवलं जातं. पण तुम्हाला माहितेय का गोड खाण्याचे सुद्धा शरीराला अनेक फायदे होतात, नेमके कोणते होतात ते जाणून घेऊयात.

साधारणपणे गोड खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, परंतु योग्य प्रमाणात गोड पदार्थांचे काही फायदे देखील आहेत.साखर हे शरीरासाठी त्वरीत ऊर्जा निर्माण करणारे प्रमुख स्त्रोत आहे. केवळ शरीर निरोगी शरीरासाठीच नाही तर सण, उत्सव किंवा कुटुंबीयांच्या कार्यक्रमात गोड पदार्थांचा समावेश आनंद आणि एकोप्याची भावना वाढवतो. त्यामुळे सामाजिक बंध दृढ होण्यास आणि मानसिक समाधान मिळवण्यास मदत होते.

शरीरातील ऊर्जा
कामकाज, व्यायाम किंवा दीर्घ प्रवासादरम्यान थकवा कमी करण्यासाठी गोड खाणे उपयुक्त ठरते.(chocolate) विशेषतः मध किंवा नैसर्गिक साखरेच्या स्रोतांमधून ऊर्जा मिळवणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर असते.साखर हा शरीरासाठी त्वरीत ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. सकाळी उठल्यावर, व्यायामानंतर किंवा दीर्घ प्रवासादरम्यान थकवा कमी करण्यासाठी हलके गोड पदार्थ उपयुक्त ठरतात.

पाय आणि कंबर सतत दुखते? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध
मानसिक ताण कमी करतं
शरीराचा आणि मनाचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे शरीर निरोगी असेल तर मनंही स्थिर असतं. मानसिक तणाव कमी होण्यास गोड पदार्थ फायदेशीर ठरतात. गोड खाल्ल्याने मेंदूत ‘सेरोटोनिन’ या सुखद हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मन प्रसन्न राहते आणि तणाव कमी होतो. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता किंवा उदासीनता असलेल्या लोकांसाठी हलके गोड पदार्थ सेवन फायदेशीर ठरते.

काही जण असे असतात की जे फिट राहण्यासाठी संपूर्णपणे गोड खाणं टाळतात. मात्र हे असं डॉक्टरांचा सल्ला न घेता करणं शरीराला त्रासदायक ठरतं. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळू नये, पण प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने वजन वाढणे, मधुमेह, दातांचे नुकसान आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे संतुलित आहारात नैसर्गिक गोड पदार्थांचा समावेश करणे सुरक्षित ठरते. मात्र प्रत्येक पदार्थ हा प्रमाणाकच खावा. असं म्हणतात की अति तिथे माती. त्यामुळे जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर मधुमेह, वजन वाढ, दातांचे नुकसान आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दररोज किंवा आठवड्यातील गोड पदार्थांचा समावेश योग्य प्रमाणात करणे अत्यंत महत्वाचे आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक