आज गुरुवारी सोन्याच्या (Gold)दरात घसरण झाली आहे. डॉलरच्या मजबूतीनंतर गुंतवणुकदार अमेरिकी फेडरल रिझर्व्ह चेअरमॅन जेरोम पॉवेल होल यांच्या संबोधनाची वाट पाहात आहेत. याचा परिणाम देशांतर्गंत घरगुती वायदे बाजारावर पाहायला मिळतोय. सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर पुन्हा एकदा किंचित दर वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी 3,337.95 डॉलर प्रति औंसवर पोहोचला होता. तर, अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 3,386,50 डॉलरवर स्थिरावले आहेत. डॉलर इंडेक्स 0.4 टक्क्यांनी वाढून दोन आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या (Gold)दरात 220 रुपयांची घसरण झाली असून 1,00,530 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण होऊन 92,150 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घसरण होऊन 75,400 रुपयांवर स्थिरावले आहे.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,530 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,400 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,215 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,053 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,540 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 73, 720 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 80, 424 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60, 320 रुपये

22 कॅरेट- 92,150 रुपये
24 कॅरेट- 1,00,530 रुपये
18 कॅरेट- 75,400 रुपये

सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प). विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या. सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध
 पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम