उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील नागीना परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.(place)१० वर्षे एकाच घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसवानं कृत्य समोर आलं आहे. या मोलकरीण महिलेने घरामध्ये भांडी घासताना त्यावर लघवी केल्याचा प्रकार आहे. संबंधित प्रकाराची माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (place)या व्हायरल व्हिडीओतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरकाम करणारी एक महिला भांडी धुताना त्यावर लघवी करताना दिसत आहे. यामुळेच तिच्या किळसवाण्या कृत्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आला आहे. तसेच येथील स्वच्छतेबाबत पूर्णत: प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर महिला ही तेथे मागील १० वर्षापासून काम करत असल्याची माहिती आहे.(place) यामुळेच महिलेनं केलेल्या या कृत्यामुळं विश्वासाला देखील तडा गेला आहे. स्वच्छता ही महत्वाची असल्याने या महिलेनं केलेल्या या कृत्यानं सर्वनाच धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरूवारी पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला नगीना पोलिस स्टेशनमध्ये अटक केली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध
 पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम