सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब आणि लोकांना थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्याला निखळ हसू येईल. असाच एक हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मख्य म्हणजे घटना तर अचंबित करणारी होतीच पण त्यानंतर जो ड्रामा घडला तो आणखीनच मजेदार ठरला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया(Boyfriend).

आपण ज्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलत आहोत त्यात काही लोक एका खोलीत प्रवेश करून बेड उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ते प्रथम बेड काढतात आणि नंतर सोफा उघडतात. तो उघडल्यावर त्यांना आत लपलेला एक माणूस आढळतो. काठीने सज्ज असलेला एक माणूस त्या लपलेल्या माणसाला त्या काठीने मारहाण करू लागतो. व्हिडिओमध्ये घटना केव्हा, कुठे किंवा काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिश्किलपणे लिहिण्यात आले आहे की, ‘हुंड्याच्या बेडसह प्रियकर फ्री’. हे कॅप्शन घटनेचा आणखीन रोमांचक रूप देते पण घटनेतील खरं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच दडलेलं आहे.

घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @sankii_memer नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे हा तर बाजूच्या गावचा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता मिळतील फ्री काठीचे फटके” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो बेडच्या आत आराम करत आहे”(Boyfriend).

हेही वाचा :

नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….