स्विगी आणि झोमॅटो सारख्या अॅप्समुळे रेस्टॉरंटमधील फूड आता (expensive)आपल्याला घरबसल्या ऑर्डर करता येतं. बरं, हे अॅप्स दिवसाचे चोवीस तास सेवा पुरवतात, त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्याचा वेळ सुद्धा वाचतो. म्हणूनच या अॅप्सचा वापर हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत गेला. शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने एकटी राहणारी मुलं तर या फूड डिलिव्हरी अॅप्सच्या जोरावर जगत आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पण वाढत्या मागणीसोबत या अॅप्सनी आपले डिलिव्हरी चार्जेसही वाढवायला सुरुवात केली. कधी पॅकेजिंगसाठी अतिरिक्त पैसे घेतले जातात तर कधी डिलिव्हरी चार्ज लावला जातो. त्यामुळे पदार्थ मूळ किंमतीपेक्षा जास्त महाग होतो. हा अनुभव आजवर अनेक ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे शेअऱ केला आहे. (expensive)मात्र, या परिस्थितीवर एका महिलेनं भन्नाट उपाय शोधून काढला. तिनं Swiggy-Zomato ला एक वेगळाच पर्याय शोधून काढलाय. आता ती हॉटेलमधलं जेवण मनसोक्त ऑर्डर करते आणि चांगली बचतही करते. चला तर मग वेळ न घालवता पाहूया हा पर्याय आहे तरी काय?

एका महिलेनं फूड डिलिव्हरी अॅप्स वापरताना आलेला अनुभव या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. तिनं Zomato किंवा Swiggy वापरणं बंद केलं आहे. आता ती थेट हॉटेलमध्ये फोन करून हवे ते पदार्थ ऑर्डर करते आणि Uber किंवा Rapido मार्फत ते पार्सल घरी मागवते. (expensive)खरं तर Uber Courier आणि Rapido हे पार्सल डिलिव्हरी अॅप्स आहेत. पण त्यांचे चार्जेस Zomato आणि Swiggy च्या तुलनेत कमी आहेत. तिला फूड डिलिव्हरीसाठी जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे हा पर्याय महिलेला खूपच फायदेशीर ठरत असून तिची चांगली बचत होत असल्याचा दावा तिनं केला आहे.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं