19 ऑगस्ट रोजी आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या आशिया कप 2025 च्या संघात अय्यरचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा रंगू लागल्या आहेत. टीम इंडियाच्या टी20 योजनांमध्ये आता श्रेयस अय्यरचा काहीही विचार नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे ना अंतिम 15 जणांच्या यादीत, ना स्टँडबाय खेळाडूंमध्ये त्याला स्थान देण्यात आलंय.
काय म्हणाला अभिषेक नायर?
या निर्णयावर टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यानेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याने स्पष्टपणे म्हटलं आहे की, अय्यरचा 20 जणांच्या यादीतही समावेश न होणं, हेच दाखवून देतं की तो सध्याच्या टी20 प्लॅनमधून पूर्णपणे बाहेर फेकला गेला आहे.