सध्या अनेक क्षेत्रांमध्ये AIचा शिरकाव झालेला दिसत आहे.(introduced)तसेच त्याचे परिणामही दिसत आहे. यामुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण असे काही क्षेत्र आहेत ज्यात AI त्याचं वर्चस्व निर्माण करू शकणार नाही. अशी कोणती क्षेत्र आहेत चला जाणून घेऊयात. या 10 नोकऱ्या सुरक्षित, ज्यांची जागा AI कधीच घेऊ शकणार नाही; तुमचा जॉब या यादीत आहे का?
सध्या सर्वत्र चर्चा असेल तर ती AI ची आहे. कारण AIने सर्वच क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक अशा खाजगी नोकऱ्या असलेले लोक त्यांच्या नोकऱ्यांबद्दल खूप चिंतेत आहेत. नोकरी क्षेत्राला प्रथम कोविड 19 चा फटका बसला आणि आता एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा फटका बसताना दिसतोय. तंत्रज्ञान दररोज अपडेट होत आहे.
आता अनेक कंपन्यांमध्ये बरीच अशी कामे आहेत जी AI च्या मदतीने केली जातात. त्याचा परिणाम अर्थातच नोकरीवर पडताना दिसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या यामुळे धोक्यात आल्या आहेत. पण अशा 10 नोकऱ्या अजूनही आहेत ज्यात AI फार हस्तेक्षेप करू शकत नाही.(introduced) परिणामी तिथे धोका कमी प्रमाणात पाहायला मिळतो. अशा कोणत्या 10 नोकऱ्या आहेत ज्या सुरक्षित मानल्या जाऊ शकतात.

या क्षेत्रांवर किंवा नोकऱ्यांवर एआयचा प्रभाव पडलेला नाही एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा आपल्या जीवनाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. यामुळे अभ्यास आणि दैनंदिन काम सोपे झाले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर एआयने आपले जीवन सोपे केले आहे. पण जेव्हा हे एआय नोकऱ्या हिरावून घेऊ लागते तेव्हा त्याचे फायदेही तोटेही दिसू लागतात. अशा काही कौशल्यावर आधारित नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊयात. जिथे सध्या एआयची विशेष गरज नाही.
थेरपिस्ट आणि कौन्सिलर : थेरपी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची असते. थेरपिस्ट आणि कौन्सिलरना त्यांच्या रुग्णांसोबत भावनिक नाते निर्माण करावे लागते. त्याशिवाय त्यांना गोष्टी समजावून सांगणे शक्य नसते. आणि AI हे काम नक्कीच मानवाप्रमाणे करू शकत नाही. याचा अर्थ सध्यातरी तिथे एआय या क्षेत्रापासून दूर आहे.
कलाकार : प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते. काही चांगले लिहितात, काही नृत्यात चांगले असतात, तर काहींमध्ये अद्भुत गायन कौशल्य असते. त्याच वेळी, बरेच लोक चांगले चित्रकारही असतात. जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही कौशल्य असेल तर तुम्ही कलाकार बनू शकता. कारण AI यात तुम्हाला फक्त कल्पना देऊ शकतं, माहिती देऊ शकतं पण तुमची जागा घेऊ शकत नाही.
विश्लेषक : कोणत्याही प्रकारची रणनीती तयार करण्यासाठी AIचा वापर केला जाऊ शकतो. परंतु उच्चस्तरीय रणनीती म्हणजेच विश्लेषण तयार करण्यासाठी मानवी कौशल्ये निश्चितच आवश्यक आहेत. (introduced)सध्या एआयमध्ये मानवांसारखी दूरदृष्टी शोधणे कठीण आहे.
शास्त्रज्ञ : कोणतेही संशोधन करण्यासाठी सर्वबाजूंनी विचारसरणी आवश्यक असते. शास्त्रज्ञ विद्यमान ज्ञानाला आव्हान देतात आणि त्यात काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतात. एवढा मेंदू फक्त मानवच वापरू शकतो. त्यामुळे इथे देखील AI त्याचं वर्चस्व निर्माण करू शकत नाही.

वकील आणि न्यायाधीश : वकील हे असे क्षेत्र आहे जिथे सध्या फक्त मानवच काम करू शकतात. वकिलांना केवळ न्यायालयात खटल्याशी संबंधित तथ्ये सादर करावी लागतात असे नाही तर त्यांना क्लायंटचा विश्वासही जिंकावा लागतो. त्याचप्रमाणे, सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय देण्याची जबाबदारी न्यायाधीशांची असते. त्यामुळे या क्षेत्रातही AI येऊ शकत नाही.
ग्राहक सेवा : ग्राहक सेवेशी संबंधित क्षेत्रात AIचा वापर थोडासा होऊ लागला आहे. परंतु येथे AIला मुख्य जबाबदारी देता येणे शक्य नाही. खरं तर, काही प्रकरणांमध्ये, तक्रारदार एखाद्या माणसाशीच बोलण्याची मागणी करतात.
आरोग्यसेवा क्षेत्रात असणारे : एआय डॉक्टरांना मदत करू शकते, परंतु रुग्णांशी वैयक्तिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सहाय्यक रुग्णांना वैयक्तिक काळजी प्रदान करतात, जे एआय करू शकत नाही.
व्यावसायिक खेळाडू : क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, बेसबॉल, थ्रोबॉल, भालाफेक, बॉक्सिंग यासारख्या खेळांमध्ये व्यावसायिक खेळाडूंची जागा AI घेईल अशी कल्पना तुम्ही करू शकता का? जर नसेल, तर हे क्षेत्र सुरक्षित समजा.
पत्रकार : पत्रकार हे समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे काम जनतेला ताज्या बातम्या, अपडेट्स आणि घडामोडींबद्दल माहिती देणे आहे. ते समाज आणि सरकार आणि इतर महत्त्वाच्या विभागांमधील पूल म्हणून काम करतात. सध्या शोध पत्रकारिता करणाऱ्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून लिहिणाऱ्या पत्रकारांसाठी AI पर्याय नक्कीच असू शकत नाही.
शिक्षक : शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. आता ऑफलाइनसोबतच ऑनलाइन शिक्षणाचा ट्रेंडही सुरू झाला आहे. मुले गृहपाठ पूर्ण करण्यासाठी एआयची मदत घेतात. पण इथेही कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या बुद्धिमत्तेला हरवू शकत नाही.माहिती मिळवण्यासाठी AI हे गुगलप्रमाणे मदत करू शकतं पण शिक्षकांची जागा नक्कीच घेऊ शकत नाही.
हेही वाचा :
भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक
एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स